स्वतःच्या मुलीचा विनयभंग करणार्‍या वडिलांना अटक

नैतिकतेचा र्‍हास झाल्याचे उदाहरण !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी मुंबई – उलवे भागात रहाणार्‍या वडिलांनी स्वतःच्या १३ वर्षांच्या मुलीसमवेत अश्‍लील चाळे करून तिचा विनयभंग केला. मुलीने विरोध केल्यावर वडिलांनी तिला मारहाण केली. पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे. न्यायालयाने ३० मार्चपर्यंत आरोपीची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.