भांडुप येथील सनराईज रुग्णालयात लागलेल्या आगीचे प्रकरण

मुंबई – विक्रोळीतील प्रिया वाघमारे आणि सोनल वाघमारे या दोघींचे वडील कोरोनाग्रस्त झाले असल्याने त्यांना भांडुपच्या ड्रीम्स मॉलमधील सनराईज रुग्णालयातील कोरोना विभागात भरती करण्यात आले होते; मात्र तेथील रुग्णालयात आग लागल्याचे समजल्यावर दोघी बहिणी घटनास्थळी पोचल्या. वडिलांविषयी चौकशी केल्यावर कोरोनाग्रस्तांना अन्यत्र हालवल्याचे समजले; पण नेमके कोणत्या रुग्णालयात नेले ? ते समजत नव्हते. (रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार ! – संपादक) जवळजवळ १७ घंट्यांनंतर पोलिसांच्या साहाय्याने वडिलांचा शोध लागला; पण त्याच रुग्णालयातील अतीदक्षता विभागात त्यांचा जळून मृत्यू झाला होता. स्वप्नील पाटील या युवकाचे आई-वडील कोरोनाग्रस्त झाल्याने त्यांना सनराईज रुग्णालयात भरती केले होते; पण रुग्णालयाला लागलेल्या आगीत त्या दोघांचाही मृत्यू झाला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या अधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार