उपअभियंता नितीन तारमाळे यांचे हृदयविकाराने निधन

नवी मुंबई महापालिकेचे उपअभियंता नितीन तारमाळे यांचे १८ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी वाशीतील फोर्टिस रुग्णालयात उपचाराच्या वेळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते तुर्भे विभागातील पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते.

पुणे शहरातील प्रमुख रस्ते स्वच्छ करण्यासाठीचा व्यय १०० कोटी रुपयांनी वाढला !

पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांचे झाडणकाम यांत्रिकीकरणाद्वारे करण्यासाठी महापालिकेने ५ वर्षांसाठी ६० कोटी रुपयांची निविदा काढली होती. त्या निविदेमध्ये अन्य तांत्रिक गोष्टींचा समावेश केल्यामुळे ठेकेदारांनी ३८ ते ८० टक्के अधिक दराने निविदा भरल्या होत्या.

पहिला विवाह लपवून दुसरा विवाह करणार्‍या महिला पोलिसासह ३ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !

पहिला विवाह लपवून दुसरा विवाह करत पतीची फसवणूक केल्याच्या प्रकरणी वंदना महेश कांबळे (वय ३९ वर्षे) या महिलेच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुणे येथे ग्रंथालयातील आगीत पुस्तकांची मोठी हानी !

जीवितहानी झालेली नाही. ग्रंथालयामध्ये आग नेमकी का लागली ? याचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही.

बेस्ट बसमधील सूचनांतील व्याकरणाच्या चुका सुधारण्याचा खर्च उत्तरदायींकडून वसूल करा !

‘मुंबईला सतत धावत्या ठेवणार्‍या ‘बेस्ट’ (बृहन्मुंबई विद्युत् पुरवठा आणि परिवहन उपक्रम) बसगाड्यांमध्ये प्रवाशांना विविध प्रकारच्या सूचना देणार्‍या पाट्या असतात. या सूचनांमध्ये मराठी भाषेच्या संदर्भातील शुद्धलेखन आणि व्याकरण यांच्या अनेक चुका असल्याचे लक्षात आले आहे…

‘आर्.टी.ई.’ अनुदान संमतीसाठी लाच घेणारी महिला अटकेत !

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आर्.टी.ई. अंतर्गत) शाळांना अनुदान देण्यात येते. या अनुदान संमतीसाठी १२ सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या प्राथमिक शिक्षण संचालनालयातील सुनीता माने या मुख्य लिपिक महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली.

अमली पदार्थांच्या पडताळणी प्रक्रियेची पूर्तता न केल्याने ८ आरोपींना जामीन

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील आरोपी असलेल्या अमली पदार्थांच्या निर्मिती प्रकरणात उच्च न्यायालयाने ८ आरोपींना जामीन संमत केला आहे. अमली पदार्थ जप्तीची कारवाई केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात सादर केलेले अमली पदार्थांचे नमुने न्याय…

सांगली येथे धर्मादाय कार्यालयाच्या दिरंगाईच्या विरोधात उपोषण !

धर्मादाय कार्यालयातील दिरंगाईच्या कारभाराच्या विरोधात १६ ऑक्टोबर या दिवशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वि.द. बर्वे यांनी येथील स्टेशन चौक येथील वसंतदादा पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण केले.

४४ विद्यार्थ्यांना पोषण आहारामधून विषबाधा !

विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या पोषण आहाराची पडताळणी केली जाते का ?