चंदन चोरट्यांवर उपचार करणार्‍या आधुनिक वैद्यांवर गुन्हा नोंद करणार ! – पुणे पोलीस

पुणे – विधी महाविद्यालयाच्या रस्त्यावर गस्त घालणार्‍या पोलिसांवर चंदन चोरांनी आक्रमण केले. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये घायाळ झालेल्या चोरट्यांवर वैद्यकीय उपचार करणार्‍या आधुनिक वैद्यावर गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली आहे. विधी महाविद्यालय रस्त्यावरील ‘जानकी व्हिला’ बंगल्याजवळ चंदन चोर थांबले होते. रात्रीच्या वेळी गस्त घालणार्‍या पोलिसांना पाहून चोरट्यांनी आक्रमण केले. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये शाहरुख पठाण, फारूकखान पठण हे धर्मांध घायाळ झाले होते. ते घायाळ अवस्थेत दुचाकीवरून छत्रपती संभाजीनगर येथे पोचले. तेथे त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले. या घटनेतील आसिफ गोलवाल याला पोलिसांनी अटक केली आहे, तर नदीम खान, लतीफ खान, फिरोज खान, नजीम खान यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांचा शोध चालू आहे. तेथील आधुनिक वैद्यांनी प्रथम वैद्यकीय माहिती पोलिसांना देणे आवश्यक होते. तशी माहिती त्यांनी पोलिसांनी दिली नाही. आधुनिक वैद्यांनी आरोपींना साहाय्य होईल, असे कृत्य केले म्हणून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात येणार आहे.