जळगाव – पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांच्या आधाराने सृष्टीची निर्मिती झाली आणि तिचे चलनवलनही चालू आहे. या पंचमहाभूतांची गाय ही माता आहे. काळाच्या ओघात तिचीच अवहेलना झाल्याने आज सर्व तर्हेचे प्रदूषण गंभीररित्या वाढले आहे. हे वेळीच रोखायचे असेल, तर गोरक्षण, गोपालन आणि गो उत्पादनांचे संवर्धन याला पर्याय नाही. एकप्रकारे गोमाता पंचमहाभूतांच्या कुपोषणाची अधिकारिणी आहे. वसुबारस या सणाच्या निमित्ताने गोमातेचे महत्त्व लक्षात घेऊन गोरक्षण, गोपालन आणि गो-उत्पादनांचे संवर्धन करण्याच्या हेतूने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील आव्हानी, नांद्रे, कानळदा, खर्ची बु, तासखेडा, तर नंदुरबार आणि भालेर येथे गोमातेचे पूजन करण्यात आले.