निवडणुकीचे काम करणार्‍या १५० कर्मचार्‍यांना नोटिसा !

मालेगाव येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणाला अनुपस्थित

प्रतिकात्मक चित्र

सोयगाव (जिल्हा नाशिक) – नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ ११५ साठी २० नोव्हेंबर या दिवशी २ सहस्र २५९ कर्मचार्‍यांसाठी घेण्यात आलेल्या १ दिवसीय प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिलेल्या १५० कर्मचार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या असून २४ घंट्यांच्या आत खुलासा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा खुलासा असमाधानकारक असल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३४ नुसार कडक कायदेशीर कारवाई करण्याची चेतावणी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिली आहे.

येथील ए.टी.टी. विद्यालय आणि मोहन चित्रपटगृह येथे २७ ऑक्टोबर या दिवशी २ सत्रांत सकाळी १० ते दुपारी १ अन् दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत निवडणूक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. मालेगाव बाह्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन (क्रमांक २) पल्लवी निर्मळ, साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मालेगाव तहसीलदार विशाल सोनवणे यांनी प्रशिक्षणार्थिंना मार्गदर्शन केले, तसेच या विधानसभा निवडणूक प्रशिक्षणास टाळाटाळ करणारे, अनुपस्थित रहाणारे यांना वरीलप्रमाणे चेतावणी देण्यात आली.