Ayodhya Rammandir Consecration : श्रीराममंदिरासाठी धनबाद (झारखंड) येथील सरस्वतीदेवी गेली ३१ वर्षे पाळत आहेत मौनव्रत !

अयोध्येत २२ जानेवारीला श्रीराममंदिराचे उद्घाटन होत आहे. श्रीराममंदिरासाठी गेल्या ३१ वर्षांपासून झारखंडच्या धनबाद येथील ८५ वर्षीय सरस्वतीदेवी मौनव्रत पाळत आहेत. श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी त्या अयोध्येला पोचल्या आहेत.

अयोध्येत शरयू नदीच्या काठावर १०० हवनकुंड बांधले !

अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्‍या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात ८ जानेवारीपासून सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाले आहेत

Ayodhya Rammandir Offerings : श्रीराममंदिराला आतापर्यंत मिळाले ५ सहस्र कोटी रुपयांचे अर्पण !

‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने दिलेल्या माहितीनुसार मंदिराच्या समर्पण निधी खात्यात आतापर्यंत ३ सहस्र २०० कोटी रुपये जमा झाले आहेत, तर आतापर्यंत श्रीराममंदिराला एकूण ५ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक देणग्या मिळाल्या आहेत.

Ayodhya Rammandir Consecration : २२ जानेवारीलाच बाळाचा जन्म व्हावा, यासाठी अयोध्येतील गर्भवती मातांचे शस्त्रकर्मासाठी रुग्णालयात अर्ज !

महिलांनी रुग्णालयांकडे यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे ‘यावर काय करावे ?’ असा प्रश्‍न रुग्णालय प्रशासनाला पडला आहे !

राज्यातील १ कोटींहून अधिक रामभक्तांना निमंत्रण देणार !

अयोध्या येथील प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी या दिवशी होणार आहे. त्यानिमित्ताने राज्यभर गृहसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे.

Moulana Toukir Raza : आमच्या मशिदी हिसकावून घेतल्या जात आहेत ! – मौलाना तौकीर रझा, ‘इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल’चे प्रमुख

इतिहासाचा यापेक्षा विपर्यास तो कोणता ? खरेतर आता हिंदूंनीच अशा अपप्रचाराच्या विरोधात जगाला खरा इतिहास सांगितला पाहिजे आणि ‘अपराधीभाव न बाळगणारे हिंदू’ (अनअपोलोजेटिक हिंदू) झाल्याची राष्ट्रव्यापी मोहीम हाती घेतली पाहिजे !

‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’कडून पुणे शहरामध्ये ‘अक्षता’ देऊन निमंत्रणाला प्रारंभ ! 

अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्‍या ‘श्रीराम मंदिर’ उद्घाटनाच्या आणि ‘श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापने’चे घरोघरी जाऊन अक्षता (निमंत्रण) देण्यास १ जानेवारी २०२४ पासून प्रारंभ करण्यात आला.

‘रामराज्य’ हे आमचे स्वप्न; मंदिर ही आमची अस्मिता ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आपले स्वप्न ‘रामराज्या’चे आहे आणि मंदिर ही आमची अस्मिता आहे. श्रीराम मंदिराच्या उभारणीमुळे देशात यापुढे रामराज्याची संकल्पना पहायला मिळेल. समाजातील सोशित, पीडित, वंचित आहे, त्याला ज्या राज्यामध्ये महत्त्व मिळते, त्याचा आवाज ऐकला जातो, त्याला ‘रामराज्य’ असे म्हटले जाते.

‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रा’चे निमंत्रण मिळाल्याविषयी ह.भ.प. बाबासाहेब पांडुरंग पाटील (बिसले महाराज) यांचे अभिनंदन ! 

ह.भ.प. बाबासाहेब पांडुरंग पाटील (बिसले महाराज) यांना ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रा’च्या वतीने श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण आले आहे. या संदर्भात सांगली येथील अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी त्यांची कर्नाटक येथील मांजरी (तालुका चिकोडी) येथे जाऊन भेट घेतली.

श्रीरामाशी संबंधित काही स्थळांचे भौगोलीय रामायण !

अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस जसा जवळ येत आहे, तशी रामभक्तीची लाट हिंदूंमध्ये वाढत आहे. श्रीरामाशी संबंधित प्रत्येक गोष्ट हिंदूंना जवळची वाटत आहे.