पुणे – आपले स्वप्न ‘रामराज्या’चे आहे आणि मंदिर ही आमची अस्मिता आहे. श्रीराम मंदिराच्या उभारणीमुळे देशात यापुढे रामराज्याची संकल्पना पहायला मिळेल. समाजातील सोशित, पीडित, वंचित आहे, त्याला ज्या राज्यामध्ये महत्त्व मिळते, त्याचा आवाज ऐकला जातो, त्याला ‘रामराज्य’ असे म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे रयतेचे राज्य रामराज्याच्या संकल्पनेतून उभे राहिले होते, अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. लोकनेते आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, तसेच ‘फिरते वाचनालया’चे लोकार्पणही करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होत. या वेळी प्रभु श्रीराम मंदिराची प्रतिकृती देऊन उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
ते पुढे म्हणाले की, रामराज्याच्या संकल्पनेमुळे काही लोकांना दुःख होते. त्यामुळे काही वाचाळवीर ‘राम मांसाहारी होते’, असे वाचाळ वक्तव्य करतात. वाचाळवीरांना प्रभु श्रीराम सुबुद्धी देतील.