Ayodhya Rammandir Consecration : श्रीराममंदिरासाठी धनबाद (झारखंड) येथील सरस्वतीदेवी गेली ३१ वर्षे पाळत आहेत मौनव्रत !

श्री रामलला विशेष !

सरस्वतीदेवी

रांची (झारखंड) – अयोध्येत २२ जानेवारीला श्रीराममंदिराचे उद्घाटन होत आहे. श्रीराममंदिरासाठी गेल्या ३१ वर्षांपासून झारखंडच्या धनबाद येथील ८५ वर्षीय सरस्वतीदेवी मौनव्रत पाळत आहेत. श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी त्या अयोध्येला पोचल्या आहेत. येथे त्या त्यांचे मौनव्रत सोडणार आहेत.

सौजन्य झी उत्तरप्रदेश उत्तराखंड 

सरस्वतीदेवी यांच्या कुटुंबियांनी सांगितले की, वर्ष १९९२ मध्ये बाबरी ढाचा पाडल्यापासून त्या शांत झाल्या होत्या. त्यांनी शपथ घेतली होती, ‘जेव्हा श्रीराममंदिर बांधले जाईल, तेव्हाच मौनव्रत सोडणार.’ महंत नृत्य गोपाल दास यांच्या प्रेरणेने त्यांनी मौनव्रत पाळले आहे. त्या अयोध्येत ‘मौनीमाता’ या नावाने प्रसिद्ध आहेत. त्या आमच्याशी हातवारे करून बोलत असतात. काही सांगायला अवघड असेल, तर त्या लिहून सांगतात.