Moulana Toukir Raza : आमच्या मशिदी हिसकावून घेतल्या जात आहेत ! – मौलाना तौकीर रझा, ‘इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल’चे प्रमुख

  • आता ‘इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल’चे प्रमुख मौलाना (इस्लामी अभ्यासक) रझा यांची श्रीराममंदिराच्या उद्घाटनावरून गरळओक !

  • राममंदिराच्या निकालावरून सर्वोच्च न्यायालयाच्या विश्‍वासार्हतेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित !

मौलाना तौकीर रझा

नवी देहली – अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह भारतातच नाही, तर जगभरात आहे. असे असले, तरी अनेक धर्मनिरपेक्षतावादी आणि हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसी यांना पोटशूळ उठला आहे. मुसलमान नेतेही यास विरोध करत आहेत. आता ‘इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल’चे प्रमुख मौलाना तौकीर रझा यांनी या विरोधात वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, मुसलमान प्रत्येक वेळी बलीदान देणार नाहीत. देशातील आमची मशीद आमच्याकडून हिसकावून घेतली जात आहे. ही गोष्ट आम्ही सहन करू शकत नाही.

सौजन्य द लीडर हिन्दी 

रझा पुढे म्हणाले की,

१. भाजपचा आमच्या अजानवरही आक्षेप आहे, ही गोष्ट कुणापासून लपलेली नाही की. खरेतर भाजपला मुसलमानांच्या अस्तित्वानेही त्रास होतो.

२. राममंदिरावर जो निकाल दिला गेला, त्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या विश्‍वासार्हतेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित होतो. सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या न्यायाधिशाने राममंदिरावर निर्णय दिला, त्याला पुढे राज्यसभेत नियुक्त करण्यात आले. याचा अर्थ राममंदिराचा निर्णय आधीच ठरवण्यात आला होता.

३. जर मला कुणी राममंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आमंत्रित केले, तरी मी त्याला उपस्थित रहाणार नाही. याचे कारण असे की, त्या कार्यक्रमाचे आयोजन हे धार्मिक कारणातून अल्प, तर राजकीय लाभ मिळवण्यासाठी अधिक प्रमाणात केले जात आहे. (हिंदूंच्या असीम त्यागातून बांधण्यात आलेल्या मंदिरावर आगपाखड करणार्‍या तौकीर रझा यांना कुणी कधीच निमंत्रण देणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे ! – संपादक)

  • ‘खोटे बोल; पण रेटून बोल’ ही रझा यांसारख्या मुसलमान नेत्यांची जुनी खोड आहे. अर्थात् अशा चिथावणीखोर वक्तव्यांच्या विरोधात रझा यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. उद्या खरेच राममंदिराच्या उद्घाटनावरून कुठे काही हिंसाचार घडलाच, तर त्याला रझा यांना उत्तरदायी धरून कारागृहात डांबले पाहिजे !
  • इतिहासाचा यापेक्षा विपर्यास तो कोणता ? खरेतर आता हिंदूंनीच अशा अपप्रचाराच्या विरोधात जगाला खरा इतिहास सांगितला पाहिजे आणि ‘अपराधीभाव न बाळगणारे हिंदू’ (अनअपोलोजेटिक हिंदू) झाल्याची राष्ट्रव्यापी मोहीम हाती घेतली पाहिजे !
  • सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर घेतलेला हा आक्षेप असून हे लोकशाहीद्रोही वक्तव्य आहे. अशा नेत्यांच्या विरोधात आता कठोर कारवाई व्हायला हवी !