देशविरोधी ‘हलाल’च्या विरोधात मोहीम उभारा !

  • मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पदाधिकार्‍यांना आदेश !

  • मनसेच्या व्यापारी सेनेकडून हलालविरोधी पत्रक

राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मुंबई – हलालच्या माध्यमातून मिळणार्‍या नफ्यातील काही भाग आतंकवादी आणि देशविरोधी कारवायांसाठी वापरला जात आहे. यामुळे हलालच्या विरोधात मोहीम उभारा, असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकार्‍यांना दिला आहे. त्यामुळे याविषयीचे एक पत्रक मनसेचे व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी काढले आहे.

मनसेचा आरोप

‘इस्लामी पद्धतीने प्राण्यांची कत्तल करण्यासाठी हलाल पद्धत वापरली जाते. यात अत्यंत क्रूरतेने प्राण्यांची हत्या करण्यात येते. त्याउलट हिंदु, शीख आणि ख्रिस्ती धर्मीय हे झटका पद्धतीने मांस खातात; परंतु कालांतराने मांस व्यवसायामध्ये हलाल मांस आणि त्यांचे विक्रेते खाटीक अन् वाल्मीकि समाज यांना एकटे पाडण्यात आले आहे. त्यांच्याकडून पारंपरिक मांसविक्रीचा व्यवसाय हिरावून घेण्यात आला’, असा आरोप मनसेचे व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केला आहे. ‘हलालच्या अंतर्गत मांस व्यवसायासह इतर शाकाहारी उत्पादने, उदा. चिप्स, बिस्कीटे, लिपस्टिक, चॉकलेट, आईस्क्रिम हे ‘जमिया उलेमा ए हिंद’ या संघटनेकडून अवैध ठरवण्यात आले आहेत. हलालची मक्तेदारी तोडून काढावी आणि वाल्मीकि समाजाला उपजिविका मिळवून द्यावी’, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • हलालसारख्या देशव्यापी षड्यंत्राच्या विरोधात मोहीम उभारण्याचा निर्णय घेणार्‍या मनसेचे अभिनंदन !
  • अशीच राष्ट्रप्रेमी भूमिका घेत हलाल अर्थव्यवस्था नष्ट करावी, ही मनसेकडून अपेक्षा !