मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ !

राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्य शासनाने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन हे धमकीचे पत्र मिळाल्याची माहिती दिली होती.

राज ठाकरे यांना यापूर्वीच ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा आहे. राज्य सरकारने ही सुरक्षा तशीच ठेवत पोलिसांच्या संख्येत वाढ केली आहे. यामध्ये एक अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा समावेश आहे. ‘अजानविषयी जे करत आहात, ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करू. तुम्हाला तर सोडणार नाहीच; परंतु राज ठाकरे यांनाही मारून टाकू’, असे धमकीच्या पत्रात लिहिले होते.