चारा घोटाळ्याच्या प्रकरणी लालूप्रसाद यादव यांना ५ वर्षांची शिक्षा !

कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी कायदा करा !

बाललैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा !

या प्रकरणी पीडितेच्या आईने माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती. त्यानंतर आरोपीविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.

आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधम दुकानदारास २० वर्षांची सक्तमजुरी !

दुकानामध्ये वेफर्स आणण्यासाठी गेलेल्या ८ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या प्रकाश बाबूराव ओझा या दुकानदाराला २० वर्षे सक्तमजुरी आणि १० सहस्र रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांनी सुनावली.

वर्ष १९९६ च्या चारा घोटाळ्याच्या ५ व्या प्रकरणात लालूप्रसाद यादव दोषी

२६ वर्षांनंतर आरोपीला दोषी ठरवण्यात येत असेल, तर याला न्याय म्हणता येईल का ?

निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी राज्याचे महिला बालकल्याण आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ मास कारावासाची शिक्षा !

ज्यांच्याकडे राज्याच्या २ विभागांचे दायित्व आहे, असे मंत्रीच जर माहिती लपवत असतील, तर अशांकडून पारदर्शक कारभाराची काय अपेक्षा करणार ?

जयपूर (राजस्थान) येथे ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍यास फाशीची शिक्षा

या मुलीवर बलात्कार करून तिला तलावमध्ये बुडवून तिची हत्या करण्यात आली होती. अशा घटनांमध्ये आरोपीला हीच शिक्षा योग्य आहे !

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील दोषी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा !

२ वर्षांपूर्वी घडलेल्या जळीत प्रकरणात मृत्यूशी झुंज देणार्‍या अंकिता पिसुड्डे हिचा १० फेब्रुवारी २०२० या दिवशी नागपूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला होता. या घटनेला २ वर्षे पूर्ण झाली असून तिच्या दुसर्‍या स्मृतीदिनी लागणार्‍या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

धनबाद (झारखंड) येथे ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍याला फाशीची शिक्षा !

बलात्काराच्या प्रकरणांत अशीच शिक्षा होऊ लागली, तर देशातील बलात्काराच्या घटना न्यून होण्यास साहाय्य होईल !

आरोपी विकेश नगराळे दोषी; आज न्यायालय शिक्षा सुनावणार ! – विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम

हिंगणघाटपासून १५ किलोमीटर अंतरावरील दरोडा येथील एका २२ वर्षीय प्राध्यापिकेला एकांगी प्रेमातून जिवंत जाळण्यात आले होते. पोलिसांनी १९ दिवसांमध्ये ४२६ पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट केले होते. या प्रकरणात एकूण ६४ सुनावणी घेत २९ साक्षीदरांचे प्रत्यक्ष जबाब नोंदवण्यात आले आहेत.