आय.ए.एस्., आय.पी.एस्. आणि खेळाडू होण्यापेक्षा पोलीस किंवा शिक्षक होण्याकडे कल !

देशातील मुलांना आय.ए.एस्., आय.पी.एस्. खेळाडू होण्यापेक्षा पोलीस किंवा शिक्षक होण्यात जास्त रस आहे, तसेच २१ टक्के मुलांना काय करायचे ? याची माहिती नाही किंवा विचार केलेला नाही, तर २.१ टक्के मुलांना काम करण्यात रस नाही, असे लक्षात आहे.

विकासआराखड्यातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यास पुणे महापालिकेकडून प्राधान्य !

विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने अपूर्ण रस्त्यांची सूची करण्याच्या सूचना पुणे महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत .

प्रजासत्ताकदिनानिमित्त राज्यात ‘महावाचन उत्सव’ साजरा होणार !

विद्यार्थ्यांना वाचनाची, लिहण्याची आवड निर्माण व्हावी. महान व्यक्तींची ऐतिहासिक कामगिरी समजावी यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये प्रजासत्ताकदिनाच्या सप्ताहामध्ये ‘महावाचन उत्सव’ राबवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री यांनी स्वतः येऊन चर्चा करावी ! – जरांगे

मनोज जरांगे यांची २५ जानेवारीला पुन्हा एकदा भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ पोचले होते. आंदोलकांशी चर्चा करून त्यानंतरच सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करू, असे जरांगे यांनी त्या वेळी सांगितले; परंतु अखेरीस ही चर्चा निष्फळ ठरली.

पुणे शहरात ४७ लाख रुपयांचा प्रतिबंधित साठा शासनाधीन !

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने शहरात आखलेल्या धडक मोहिमेत ४७ लाख २२ सहस्र ३०० रुपयांचा प्रतिबंधित साठा आणि एक वाहन शासनाधीन केले आहे.

Pune Drugs Racket : पुणे येथील अमली पदार्थांची विक्री करणार्‍या ललित पाटील याच्या विरोधात ७ सहस्र पानांचे आरोपपत्र प्रविष्ट !

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.सी. बिराजदार यांच्या न्यायालयामध्ये हे आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे.

कांदळी (जिल्हा पुणे) येथील श्रीराममंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन !

‘श्रीरामचंद्र देव ट्रस्ट’ आणि ‘प.पू.भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट’ अन् समस्त कांदळी ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये काकड आरती, अभिषेक, भजन, प्रवचन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

पुणे येथे धर्मांधाकडून कोयता फिरवत दहशत माजवण्याचा प्रयत्न !

एका धर्मांधाच्या आक्रमकतेला विरोध न करणारे आणि बघ्याची भूमिका घेणारे हिंदू धर्मांधांच्या समुहाचा कधी सामना करू शकतील का ?

पुणे येथे लाच स्वीकारतांना अधिवक्त्यासह पोलीस उपनिरीक्षकास अटक !

जनतेचे रक्षणकर्तेच भ्रष्टाचार करत असतील, तर कायद्याचे राज्य कसे येणार ? अशांना कठोर शिक्षा त्वरित होणे आवश्यक !

पुणे येथे राज्यातील पहिले स्वतंत्र पॉक्सो न्यायालय !

प्रस्तावित नव्या स्वतंत्र इमारतीमुळे पॉक्सोतील खटले जलद निकाली निघण्यास मोठे साहाय्य होईल, तसेच बालस्नेही सुविधांमुळे साक्षीदारांना सुरक्षित वातावरण उपलब्ध होईल, असे फौजदारी वकील अधिवक्ता गणेश माने यांनी सांगितले.