काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंदिरांचे सोने घेण्याच्या मागणीस धर्माभिमानी हिंदूंचा ट्विटरवरून विरोध

त्यांच्या विरोधात धर्माभिमानी हिंदूंनी ट्विटरच्या माध्यमांतून प्रतिक्रिया व्यक्त केल्या. धर्माभिमानी हिंदूंनी   #CongressEyesTemplesGold हा हॅशटॅग बनवून त्याद्वारे विरोध चालू केला आहे. हा ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ८ व्या स्थानावर होता आणि त्यावर ३५ सहस्रांहून अधिक ट्वीट करण्यात आले. यात अनेकांनी काँग्रेसवर टीका केली.

७० वर्षांतील विविध घोटाळ्यांत जनतेच्या लुटलेल्या ४ लाख ८२ सहस्र कोटी रुपयांचा हिशेब काँग्रेसच्या नेत्यांनी द्यावा ! – हिंदु जनजागृती समिती

श्रीरामाला काल्पनिक घोषित करणार्‍या काँग्रेसचा डोळा हिंदु मंदिरांतील सोन्यावर ! हिंदूंच्या मंदिरांतील सोने घेण्याचे कपटी आवाहन काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

कल्याण येथे शासकीय रुग्णालयात ख्रिस्ती प्रचारक परिचारिकेकडून होणारा बायबलचा प्रचार हिंदुत्वनिष्ठांंनी थांबवला !

प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याच्या वृत्तीचे धर्मांध ख्रिस्ती ! अशांवर कारवाई करणे अपेक्षित ! पूर्व भागातील नेतीवली येथे असलेल्या शासकीय रुग्णालयात ख्रिस्ती प्रचारक असलेल्या परिचारिकेकडून रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना ‘नवा करार’ची (बायबलची) प्रत देऊन ख्रिस्ती पंथाचा प्रचार केला जात होता.

शासकीय रुग्णालयातील हिंदूंच्या धर्मांतराच्या कारवाया शासनाने रोखाव्यात !

कल्याणच्या नेतीवली येथील शासकीय रुग्णालयात ख्रिस्ती प्रचारक असलेल्या परिचारिकेकडून रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना बायबलची प्रत देऊन ख्रिस्ती पंथाचा प्रचार केला जात असल्याचे आढळल्यावर हिंदुत्वनिष्ठांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.