मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा अफगाणिस्तानचा सर्वोच्च नेता ! – तालिबानची घोषणा

तालिबानने मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा याला त्यांचा सर्वोच्च नेता असल्याचे घोषित केले आहे. ‘टोलो न्यूज’च्या वृत्तानुसार, तालिबानने मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा याच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष देश चालवणार असल्याचे म्हटले आहे.

(म्हणे) ‘आम्ही सांस्कृतिक, आर्थिक आणि व्यावसायिक स्तरांवर भारतासमवेत काम करण्यास उत्सुक’ ! – तालिबानचा साळसूदपणा

भारत आतंकवाद्यांशी कोणतेही संबंध ठेवत नाही, असे भारताने तालिबानला ठणकावून सांगितले पाहिजे !

जनतेने आवाज उठवल्यास सरकार झुकेल आणि जाचक कायदे रहित केले जातील ! – अण्णा हजारे

‘देश बचाव जनआंदोलना’च्या कार्यकर्त्यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट !

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जनआशीर्वाद यात्रा पुढे ढकलावी ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र प्रमुख, करणी सेना

कोरोनाची तिसरी लाट पसरू नये, यासाठी विरोधी पक्षाने सहकार्य करावे, असे आवाहन श्री. सेंगर यांनी केले आहे.

मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे ! – अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

दहा दिवसांत मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही, तर मोठे ‘जेलभरो आंदोलन’ करा, मी तुमच्यासमवेत राहीन, असे ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्‍वर येथे अटक : जाणून घ्या सर्व घडामोडी…

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण

केंद्र सरकारकडून अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन

केंद्र सरकारने अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी २६ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज केंद्रबिंदू असतील, तर तुमच्या भाषणाचा आरंभ त्यांच्या नावाने का होत नाही ? – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

पत्रकार परिषदेला संबोधित करतांना त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले.

कोशांबी (उत्तरप्रदेश) येथे ‘तिरंगा यात्रे’मध्ये विनामूल्य मिळणार्‍या पेट्रोलसाठी भाजप कार्यकर्त्यांमध्येच हाणामारी

भारतात सर्व राजकीय पक्षांनी लोकांना कोणतीही गोष्ट फुकट देण्याची वाईट सवय लावल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली. राजकीय पक्षांनी जनतेला साधना शिकवली असती, तर तिरंगा यात्रेसाठी लोक स्वतःहून आले असते !

तिरंगा फडकावण्यास विरोध करणार्‍या विचारसरणीचा निषेध ! – ‘अभाविप’

राजकारण्यांनी लोकांना ध्वजारोहणाला विरोध करण्यास परावृत्त केले.या विचारसरणीचा निषेध !