भारतात सर्व राजकीय पक्षांनी लोकांना कोणतीही गोष्ट फुकट देण्याची वाईट सवय लावल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली. राजकीय पक्षांनी जनतेला साधना शिकवली असती, तर तिरंगा यात्रेसाठी लोक स्वतःहून आले असते !
कोशांबी (उत्तरप्रदेश) – येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट या दिवशी आमदार संजय कुमार गुप्ता यांनी तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. मोठ्या संख्येने गर्दी होण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांसाठी आमदार गुप्ता यांनी विनामूल्य पेट्रोल देण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे मोठ्या संख्येने कार्यकर्ते यात्रेसाठी आले होते. हे पेट्रोल मिळवण्यासाठी भाजपचेच कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. धक्काबुक्कीचे रूपांतर हाणामारीत झाले.
बीजेपी कार्यकर्ता आपस में ही भिड़ गए और नौबत मारपीट तक पहुंच गई #UttarPradesh https://t.co/lDehD3E3Po
— AajTak (@aajtak) August 16, 2021
स्वत:चा जीव धोक्यात घालून लोक पेट्रोलच्या बाटल्या मिळवण्यासाठी धडपडत होते. या वेळी काही अनर्थ घडला असता, तर शेकडो लोकांच्या जिवावर बेतले असते; मात्र त्याची कोणतीही पर्वा न करता लोकांची विनामूल्य पेट्रोलसाठी एकच झुंबड उडाल्याचे दृश्य होते.