झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची आमदारकी रहित करण्याचे निवडणूक आयोगाचे राज्यपालांना पत्र

रांची (झारखंड) – केंद्रीय निवडणूक आयोगाने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन  यांचे विधानसभेचे सदसत्व रहित करा, असे पत्र झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांना पाठवले आहे. सकाळीच हे पत्र राज्यपालांकडे पोचले आहे. यावर अंतिम निर्णय राज्यपालांना घ्यायचा आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रांचीतील अनगडा इथे दगड खाण लीज प्रकरणी लोकप्रतिनिधी कायदा १९५१ चे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला होता. तसेच त्यांचे सदस्यत्व रहित करण्याची मागणी राज्यपालांकडे केली होती. सोरेन यांच्याकडेच खाण आणि वन मंत्रीपद असून त्यांनी स्वत:लाच दगड खाण वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. या आरोपानंतर आता त्यांचे विधानसभेचे सदस्यत्व रहित करण्याची शिफारस निवडणूक आयोगाने राज्यपालांना पाठवलेल्या पत्रामध्ये केली आहे.