विधानसभेच्‍या विरोधीपक्ष नेतेपदी काँग्रेसचा दावा !

अजित पवार यांनी सत्तेत असलेल्‍या भाजप-शिवसेना यांना पाठिंबा दिल्‍यामुळे विरोधी पक्षातील राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या आमदारांची संख्‍या घटली आहे. त्‍यामुळे अजित पवार यांनी त्‍यागपत्र दिल्‍यामुळे रिक्‍त झालेल्‍या विरोधी पक्ष नेतेपदावर काँग्रेसने दावा केला आहे.

‘राष्‍ट्रवादी काँग्रेस’ नाव आणि ‘घड्याळ’ पक्षचिन्‍ह आमचेच ! – अजित पवार, उपमुख्‍यमंत्री

जे आमदार माझ्‍यासमवेत आहेत त्‍यांचे भविष्‍य चांगले राहील, याचे दायित्‍व आमच्‍याकडे आहे. राज्‍यात राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्‍ही अधिक बळकट करणार आहोत, असे वक्‍तव्‍य अजित पवार यांनी ३ जुलै या दिवशी मुंबईतील पत्रकार परिषदेत केले.

अजित पवार यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट !

या वेळी त्‍यांच्‍यासमवेत राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते प्रफुल्ल पटेल, राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि सुनील तटकरे उपस्‍थित होते. या भेटीत महायुतीच्‍या पुढच्‍या धोरणाविषयी चर्चा झाल्‍याचे बोलले जात आहे.

अजित पवार गटाकडून राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या प्रदेशाध्‍यक्ष पदावरून जयंत पाटील यांची हकालपट्टी !

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्‍यक्ष म्‍हणून सुनील तटकरे यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. पक्षाच्‍या वतीने महाराष्‍ट्रातील पुढील निर्णय सुनील तटकरे घेतील, अशी घोषणाही प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे, असे मुंबईत लावले फलक !

शहरात काही ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावे, असे फलक लावण्‍यात आले आहेत. हे फलक नेमके कुणी लावले ? हे अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट : अजित पवार यांच्यासह ९ नेते सरकारमध्ये सहभागी !

सरकारमध्ये सहभागी होताच पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या घोषणापत्रात हिंदु राष्ट्राचे आश्वासन देणार्‍यांनाच हिंदू पाठिंबा देतील !

ज्याप्रमाणे राममंदिरासाठी हिंदूंनी लढा दिला, त्याहून अधिक तीव्रतेने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीसाठी संघर्ष करायला हवा !

केंद्रेकर यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्यास सरकारने भाग पाडले ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

येथील विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या स्वेच्छा निवृत्तीनंतर राजकीय वातावरण तापत आहे. सरकारला प्रामाणिक अधिकारी नकोत. केंद्रेकर यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्यास सरकारने भाग पाडले आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला…

नरेंद्र मोदी यांच्‍या तोडीचा एकही नेता नाही; राहुल गांधी परदेशात देशाची अपर्कीती करतात ! – देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर – कोरोना लस सिद्ध करणे हे भारतासाठी मोठे यश आहे. लस घेण्‍यासाठी भारतीय नागरिकांना एक रुपयाही द्यावा लागला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्‍ट्राला भरभरून दिले आहे. सध्‍या ४ लाख कोटी रुपयांची कामे महाराष्‍ट्रात चालू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या तोडीचा एकही नेता सध्‍या जगात नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची … Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जुलैमध्‍ये राज्‍याचा मंत्रीमंडळ विस्‍तार होणार; निर्णय मुख्‍यमंत्री घेणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ जून या रात्री विलंबाने देहली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रीमंडळ विस्‍ताराचे सूत्र ठरल्‍याची माहिती आहे.