जळगाव येथे आंदोलनाआधी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या नेत्‍या रोहिणी खडसे पोलिसांच्‍या कह्यात !

राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या २७ जून या दिवशी शहरातील दौर्‍याच्‍या आधी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या रोहिणी खडसे यांच्‍यासह पदाधिकार्‍यांना पोलिसांनी कह्यात घेतले.

अधिवक्‍ता गुणरत्न सदावर्ते यांच्‍या पॅनलने १९ जागा जिंकल्‍या !

महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात प्रदीर्घ काळ चालू असलेल्‍या एस्.टी. कर्मचार्‍यांच्‍या आंदोलनाचे नेतृत्‍व करणारे अधिवक्‍ता गुणरत्न सदावर्ते यांच्‍या पॅनलने स्‍टेट ट्रान्‍सपोर्ट को-ऑप बँकेच्‍या निवडणुकीत बाजी मारली आहे. बँकेतील संचालकपदाच्‍या १९ जागांसाठी ही निवडणूक झाली होती.

आदित्‍य ठाकरे यांच्‍या आरोपांना पत्रकार परिषद घेऊन सडेतोड प्रत्‍युत्तर देणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

दीपक केसरकर म्‍हणाले, ‘‘आदित्‍य ठाकरे यांच्‍यासारख्‍या तरुणांना शिकवणारे दुसरेच कुणीतरी आहे. ‘खोटे बोला; पण रेटून बोला’, असे करून आमच्‍यावर खोटे आरोप करत आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहराच्‍या नामांतरास ७५ वर्षे लागली, हे दुर्दैव ! – भाजपचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते सुधांशू त्रिवेदी

‘अलाहाबाद’चे ‘प्रयागराज’ झाले, ‘राजपथ’ पालटून ‘कर्तव्‍यपथ’ झाले, राष्‍ट्रपती निवासस्‍थानातील ‘मुघल गार्डन’चे ‘अमृत उद्यान’ झाले आणि ‘औरंगाबाद’चे ‘छत्रपती संभाजीनगर’ झाले

तांदूळाच्‍या वाटपामध्‍ये केंद्र सरकार राजकारण करत आहे ! – सिद्धरामय्‍या, मुख्‍यमंत्री, कर्नाटक

‘भ्रष्‍टाचार म्‍हणजे शिष्‍टाचार ’ हे घोषवाक्‍य देऊन इंदिरा गांधींनी ते अमलात आणले. असे नेते असणार्‍या काँग्रेसच्‍या नेत्‍यांना हे बोलण्‍याचा अधिकार काय ?

रुमडामळ (गोवा) पंचायत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कायद्यानुसार चालते ! – पंच विनायक वळवईकर यांचा आरोप

मुसलमान बहुसंख्य झाले आणि त्यात धर्मांध मुसलमानांचा सहभाग असला की, हिंदूंची काय स्थिती होते पहा ! यासाठीच भारतात हिंदु राष्ट्र हवे ! कारण हिंदु बहुसंख्येने निवडून आले, तरी ते धर्मनिरपेक्ष राहतात आणि मुसलमान पंचसदस्याला सामावूनही घेतात.

आतंकवादी झाकीर नाईक याच्‍याकडून महसूलमंत्र्यांच्‍या संस्‍थेला कोट्यवधींचे साहाय्‍य !

राज्‍याचे महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या संस्‍थेला आतंकवादी झाकीर नाईक याच्‍याकडून साडेचार ते पाच कोटी रुपयांचे अर्थसाहाय्‍य्‍य मिळाले असून राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने गुन्‍हा नोंद करून अन्‍वेषण करावे. देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे माहिती नसेल, तर आम्‍ही माहिती द्यायला सिद्ध आहोत …

मुख्‍यमंत्र्यांच्‍या दसरा मेळाव्‍याविषयी याचिकाकर्त्‍याला प्रतिज्ञापत्र सादर करण्‍याचे न्‍यायालयाचे आदेश !

या कार्यक्रमासाठी एकूण १० कोटी रुपये खर्च झाला, असा आरोप याचिकाकर्त्‍याने केल्‍याने न्‍यायालयाने याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्‍याचे निर्देश दिले आहेत.

‘आणीबाणी’ची पन्नाशी : कोकणातील सत्याग्रही आणि ‘मिसा’बंदींचा माहितीकोश होणार !

वर्ष २०२५ मध्ये आणीबाणीला ५० वर्षे होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणातील सर्व सत्याग्रही आणि ‘मिसा’बंदींचा माहितीकोश सिद्ध (तयार) करण्यात येणार आहे.

आमच्‍या देवतांना शिव्‍या घालून खिल्ली उडवणारे शिवसेनेचा चेहरा कसा होऊ शकतात ? – प्रा. मनीषा कायंदे, आमदार

काँग्रेसमधून काही जण येतात आणि मग ते आम्‍हालाच काहीतरी शिकवतात. ते सहन होत नव्‍हते. मी वयाच्‍या २५ व्‍या वर्षापासून शिवसेनेची मतदार आहे. पूर्वी भाजपात असले, तरी विचारांनी शिवसैनिक आहे.