कट्टर राष्ट्रनिष्ठा बाळगणार्या, म्हणजे उजवी विचारसरणी असणार्या राजकीय पक्षांचे सत्तेवर येण्याचे प्रमाण युरोपात वाढले !
अॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – युरोपची पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या नेदरलँड्समध्ये २२ नोव्हेंबर या दिवशी संसदेची निवडणूक पार पडली. यामध्ये कट्टर राष्ट्रनिष्ठ असलेल्या ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या पक्षाला सर्वाधिक मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असे झाले, तर या पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष आणि कट्टर इस्लामविरोधी नेते गीर्ट विल्डर्स हे नेदरलँड्सचे पंतप्रधान बनतील. नेदरलँड्समध्ये जवळपास १३ वर्षे मार्क रुटे यांचा पक्ष सत्तेत होता; परंतु या निवडणुकीत सत्तापालट होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असल्याचे युरोपीय प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे.
❤️ 37 ZETELS ❤️ pic.twitter.com/kzD6PiiCkQ
— Geert Wilders (@geertwilderspvv) November 23, 2023
विल्डर्स यांच्या पक्षाला ३७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसर्या क्रमांकावर डावा पक्ष असून त्याला २५, तर मध्य विचारसरणी असणार्या पक्षाला २४ जागा मिळतील. २० जागा मिळण्याची शक्यता असणारा पक्ष विल्डर्स यांना त्याचे समर्थन देऊ शकतो. यातून त्यांना त्यांचे सरकार स्थापन करता येईल.
१. गेल्या दशकभरापासून अनेक देशांमध्ये साम्यवादी अथवा धर्मनिरपेक्षतावादी विचारसरणी असलेल्या राजकीय पक्षांहून उजव्या विचारसरणीच्या पक्षांची सरकारे स्थापन होत आहेत. यांमध्ये अमेरिकेतील ट्रम्प सरका, इटलीतील ज्योर्जिया मेलोनी यांचे सरकार, हंगेरी येथील विक्तोर ओर्बन यांचे सरकार, भारतात नरेंद्र मोदी यांचे सरकार ही त्यांतील काही प्रमुख उदाहरणे होत. युरोपातीलच फिनलँड आणि स्वीडन येथेही उजव्या पक्षांची सरकारे आहेत.
२. नेदरलँड्समध्ये यंदा झालेल्या निवडणुकीत प्रामुख्याने शरणार्थी मुसलमानांचा तेथील साधनसंपत्तीवर, तसेच मूळ नागरिकांच्या अधिकारांवर कशा प्रकारे दुष्परिणाम होत आहे ?, यावर भर देण्यात आला. स्वत: विल्डर्स आणि त्यांच्या पक्षाने हा विषय उचलला अन् अन्य राजकीय पक्षांनीही यावर त्यांची मते मांडली. त्यामुळे संपूर्ण निवडणुकीत महत्त्वपूर्ण समस्यांपैकी ही एक समस्या म्हणून समोर आली. त्याचा लाभ विल्डर्स यांच्या पक्षाला झाल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या प्रक्षोभक विधानांमुळे त्यांना ‘नेदरलँड्सचे डोनाल्ड ट्रम्प’ म्हणून संबोधले जाते.
Right wing on a roller-coaster in Europe; Now it's the #Netherlands !
Staunch anti-I$l@mist Leader @geertwilderspvv on the verge of becoming the next PM of Netherlands !
Europe witnesses rise in the power of staunch Nationalist political parties having right-wing ideologies!… pic.twitter.com/rkv65AykPz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 23, 2023
गीर्ट विल्डर्स यांचा भारताशी असलेला संबंध !गीर्ट विल्डर्स हे जागतिक स्तरावर ‘इस्लामवर टीका करणारे नेते’ म्हणून प्रसिद्ध आहेत. ते वर्ष १९९८ पासून सातत्याने खासदार म्हणून निवडून येत आहेत. त्यांनी वर्ष २००४ मध्ये महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केले होते. तेव्हापासून ते जगभरातील जिहादी आतंकवाद्यांचे लक्ष्य आहेत. त्यामुळे अनुमाने २० वर्षांपासून त्यांना संरक्षण पुरवण्यात येत आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी पैगंबर यांच्याविषयी केलेल्या विधानांनंतर जागतिक नेत्यांपैकी विल्डर्स हे शर्मा यांचे समर्थन करण्यात अग्रक्रमावर होते. ते सातत्याने हिंदूंच्या बाजूने त्यांचे विचार मांडतात.
‘मी इस्लामचा द्वेष करतो, मुसलमानांचा नाही’, असेही ते नेहमी सांगतात. |