गुन्हेगारी जगताशी संबंध ठेवणार्‍या राजकीय नेत्यांची सूची सार्वजनिक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

२७ वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेल्या अहवालावर अद्यापपर्यंत कारवाई होत नाही, हा भारतीय लोकशाहीवर लागलेला कलंकच आहे, असे कुणी म्हटल्यास त्यात चुकीचे ते काय ? भारतीय राजकारणाची ही शोकांतिका नव्हे तर आणखी काय ?

(म्हणे) ‘मुसलमानांना राजकारणामध्ये सहभागी होण्याचा अधिकार असू नये, या खोटेपणावर हिंदुत्व आधारित ! – असदुद्दीन ओवैसी

‘हिंदुत्वा’ची स्वतःला हवी तशी व्याख्या करण्यात किंवा अर्थ काढून त्यावर टीका करण्यात हुशार असणारे ओवैसी !

गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या राजकारण्यांविरुद्ध कारवाई न होणे, ही लोकशाहीची शोकांतिका !

‘ही सर्व परिस्थिती पहाता हिंदु राष्ट्र, म्हणजे रामराज्य स्थापित व्हावे आणि धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था यावी’, असे आम्हा जनतेला वाटते. त्रिकालज्ञानी संतांच्या सुवचनांप्रमाणे, तो सुदिन फार दूर नाही, ही श्रद्धा असून तो आमचा निर्धार आहे.’

दलितांसाठी सरकारी केशकर्तनालय उघडावीत !

रोगापेक्षा उपचार भयंकर ! अशा प्रकारची सरकारी केशकर्तनालये उघडण्यापेक्षा समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत; मात्र मतांसाठी जाणीवपूर्वक जातीभेद कायम ठेवणारे राजकारणी असे कदापि होऊ देणार नाहीत, हेही तितेकच खरे !

कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन ७ डिसेंबरपासून बेंगळुरू येथे

कर्नाटक राज्यातील विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर ते १५ डिसेंबर या काळात बेंगळुरू येथे होणार आहे.

काँग्रेसने हकालपट्टी केलेले उर्फान मुल्ला यांचा भाजपात प्रवेश

काँग्रेसने १७ नोव्हेंबर या दिवशी पुढील ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केलेले काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे माजी प्रमुख उर्फान मुल्ला यांनी त्यांच्या समर्थकांसह १८ नोव्हेंबर या दिवशी भाजपात रितसर प्रवेश केला.

काँग्रेससाठी आता पराभव सर्वसामान्य घटना ! – काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांची पक्ष नेतृत्वावर टीका

काँग्रेस आता भंगारात काढण्यासारखा पक्ष झाला आहे, हे त्यांच्या नेत्यांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे मोहनदास गांधी यांनी ७ दशकांपूर्वी सांगितलेली काँग्रेस विसर्जित करण्याचे मत काँग्रेसने आता स्वीकारून तिला विसर्जित करावे !

…तर मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळाला त्यागपत्र देऊन पुन्हा शपथ घ्यावी लागेल ! – अनंत कळसे, माजी प्रधान सचिव

राज्यघटनेच्या कलम १६४ (४) नुसार उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर कायम रहाण्यासाठी पदाची शपथ घेतल्यापासून ६ मासांच्या आत विधानसभा आणि विधान परिषद यांचे सदस्य होणे आवश्यक आहे.

मालेगाव (जिल्हा नाशिक) येथे एम्.आय.एम्. आमदाराच्या समर्थकाकडून त्यांच्यासमोरच वैद्यकीय कर्मचार्‍यास मारहाण

येथील एम्.आय.एम्.चे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या समर्थकाने येथील सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता आधुनिक वैद्य किशोर डांगे यांना धक्काबुक्की केली आणि वैद्यकीय कर्मचारी मयूर जाधव यांना मारहाण केली.