वाळपई, १८ नोव्हेंबर (वार्ता.) : सत्तरी तालुक्यातील भिरोंडा पंचायत क्षेत्रातील ‘अब्दुल चाचा की बस्ती’मधील १२ अवैध घरे हटवण्याच्या सत्तरी तालुक्याच्या उपजिल्हाधिकार्यांच्या आदेशाला गोवा प्रशासकीय लवादाने स्थगिती दिली आहे. यासंबंधी सुनावणी २१ नोव्हेंबर या दिवशी होणार असून तोपर्यंत घरांना अभय मिळणार आहे.
हंसोळे, भिरोंडा येथे सर्वेक्षण क्रमांक १९/१ मध्ये शेतीच्या भूमीत १२ अनधिकृत घरे उभारण्यात आली आहे. या घरांना भिरोंडा पंचायत किंवा अन्य कुठल्याही सरकारी खात्याची अनुमती नाही. (घरे उभी राहीपर्यंत भिरोंडा पंचायत गप्प का राहिली ? पंचायतीवर राजकीय दबाव होता, तर त्या व्यक्तीचे नावही उघड करावे ! – संपादक) या घरात प्ररप्रांतीय रहातात आणि त्यांच्या विरोधात स्थानिकांनी अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले आहेत. ग्रामसभेतही यावर आवाज उठवण्यात आला आहे. याविषयी तक्रार प्रविष्ट करण्यात आल्यानंतर उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांच्यासमोर खटला चालू झाला. उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन अवैध घरे पाडण्याचा आदेश दिला. १७ नोव्हेंबर या दिवशी या घरांवर कारवाई होणार होती; मात्र ‘अब्दुल चाचा की बस्ती’मधील अब्दुल या व्यक्तीने उपजिल्हाधिकार्यांच्या निर्णयाला गोवा लवाद न्यायप्राधिकरणात आव्हान दिले. अल्प वेळेत घरे हटवण्याचा आदेश दिल्याचे अब्दुल यांचे म्हणणे होते. गोवा लवाद प्राधिकरणाने उपजिल्हाधिकार्यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.
उपजिल्हाधिकार्यांच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत !
सत्तरी तालुक्यात अनेक भागांमध्ये परप्रांतियांनी अवैधरित्या भूमीवर कब्जा मिळवून त्या ठिकाणी घरे उभारण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे आगामी काळात येथील अनेक भाग संवेदनशील बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (याचे कारण या परप्रांतियांमध्ये सर्व जण किंवा बहुतांश जण मुसलमान असतात ! – संपादक) सत्तरी तालुक्याचे उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी अवैध घरांच्या विरोधात दिलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. उपजिल्हाधिकार्यांच्या या निर्णयामुळे सत्तरी तालुक्यातील अवैध वस्त्या निर्माण करण्यास आळा बसणार असल्याची धारणा स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे.
‘अब्दुल चाचा की बस्ती’मधील अब्दुल कोण ?‘अब्दुल चाचा की बस्ती’मधील अब्दुल याला राजकीय पाठबळ होते आणि या जोरावर त्याने अनधिकृत वस्ती उभारली. (संबंधित राजकीय व्यक्तीलाही जनतेने खडसावले पाहिजे ! – संपादक) ‘बस्ती’वर कारवाई होऊ नये, यासाठी त्याने शर्थीचे प्रयत्न केले; मात्र त्याला यश आले नाही. |