कन्हैयालाल यांच्या हत्येला एक वर्ष उलटल्यानंतरही कुटुंबियांवरील तणाव कायम !

एक वर्षानंतरही अस्थींचे केले नाही विसर्जन !
आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत चपला न घालण्याचा मुलाचा पण !
कुटुंबियांना आजही आहे पोलीस संरक्षण !

अक्षरधाम मंदिराजवळ ड्रोन जप्त : बांगलादेशी महिलेची चौकशी !

भारतात कारवाई होण्याचे जराही भय न उरल्यामुळेच बांगलादेशी घुसखोरांची आता ड्रोनद्वारे अप्रत्यक्षपणे हेरगिरी करण्यापर्यंत मजल गेली आहे ! हे पोलिसांना लज्जास्पद !

वरिष्‍ठ पोलीस निरीक्षकांच्‍या विरोधात ठाण्‍यातील ११ महिला कर्मचार्‍यांचा तक्रार अर्ज !

पोलीस खात्‍यात असे वरिष्‍ठ अधिकारी असतील, तर कधीतरी कायद्याचे राज्‍य येईल का ? आपल्‍याच विभागात योग्‍य पद्धतीने न वागणार्‍या अधिकार्‍यांवर कुणाचा वचक कसा नाही ?

छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी रुग्‍णालयात आलेला बंदीवान पसार !

एका आरोपीकडे लक्ष देण्‍यासाठी ३ पोलीस असतांनाही ते योग्‍य तर्‍हेने लक्ष  देऊ शकत नाहीत, हे पोलीस प्रशासनाला लज्‍जास्‍पद ! असे पोलीस जनतेचे आतंकवाद्यांपासून सक्षमपणे रक्षण करू शकतील का ? 

मॅनहोलची स्‍वच्‍छता करणार्‍या कर्मचार्‍याच्‍या अंगावरून गाडी गेल्‍याने मृत्‍यू !

मॅनहोल (भूमीगत गटारात जाण्‍याचा मार्ग) मध्‍ये उतरून ड्रेनेजची यंत्रणा स्‍वच्‍छ करणार्‍या कर्मचार्‍याच्‍या अंगावरून गाडी गेली. जगवीर यादव (वय ३७ वर्षे) असे त्‍याचे नाव आहे. तो वर येत असतांनाच गाडी अंगावरून गेल्‍याने तो मॅनहोलमध्‍येच अडकला.

नागपूर येथे इयत्ता १० वीत शिकणार्‍या मुलीचा विवाह रोखला !

इयत्ता १० वीत शिकणार्‍या अल्‍पवयीन मुलीचा ३० वर्षीय तरुणासमवेत होणारा विवाह महिला आणि बालविकास विभागाच्‍या पथकाने धंतोली पोलिसांच्‍या साहाय्‍याने रोखला.

माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि साहाय्‍यक पोलीस निरीक्षक राहुल राऊत यांना ५ दिवस पोलीस कोठडी !

या दोघांना कोल्‍हापूर पोलिसांनी सोलापूर येथून कह्यात घेतले आणि न्‍यायालयात उपस्‍थित केले. आत्‍महत्‍या करण्‍याच्‍या पूर्वी संतोष शिंदे यांनी लिहिलेल्‍या चिठ्ठीत पुण्‍यातील अन्‍य दोघांचीही नावे असून पोलीस या प्रकरणाचे अधिक अन्‍वेषण करत आहेत.

गोरक्षकांवर खोटे गुन्‍हे नोंद करणार्‍या पोलिसांच्‍या विरोधात पुणे येथे चिल्लर फेक आंदोलन’ !

गोरक्षकांवर जाणूनबुजून खोटे गुन्‍हे नोंद केल्‍याविषयी पोलीस प्रशासनावर कारवाई व्‍हावी, यासाठी हे आंदोलन करण्‍यात आले. गोरक्षक श्री. अक्षय कांचन यांनी एक गाडी पकडली होती. त्‍यामधील म्‍हशी पोलिसांनी कोणताही विचार न करता पशूवधगृहामध्‍ये दिल्‍या

उत्तरप्रदेशमध्ये प्रशिक्षण संस्थेच्या नावाखाली मदरसा चालवणार्‍या मौलवीला अटक

प्रशिक्षण संस्थेच्या नावाखाली अनधिकृत मदरसा चालू करेपर्यंत पोलीस झोपले होते का ? यातील उत्तरदायी पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !

गुजरात दंगलीतील ३५ हिंदूंची २० वर्षांनंतर निर्दोष मुक्तता !

ढोंगी धर्मनिरपेक्ष प्रसारमाध्यमे आणि संघटना यांच्या दबावामुळे हिंदूंना अनावश्यक खटल्याला सामोरे जावे लागले ! – न्यायालयाची टिपणी