वरिष्‍ठ पोलीस निरीक्षकांच्‍या विरोधात ठाण्‍यातील ११ महिला कर्मचार्‍यांचा तक्रार अर्ज !

( प्रतिकात्मक छायाचित्र )

पुणे – शहरातील दक्षिण भागातील एका पोलीस ठाण्‍यातील वरिष्‍ठ निरीक्षकांच्‍या विरोधात ठाण्‍यातील ११ महिला पोलीस कर्मचार्‍यांनी तक्रार अर्ज दिला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्‍यासाठी पोलीस आयुक्‍त रितेशकुमार यांनी चौकशी समिती स्‍थापन करावी, अशीही मागणी करण्‍यात आली आहे.

यांच्‍या विरोधात तक्रारींमध्‍ये गंभीर आरोप करण्‍यात आले आहेत. वेळोवेळी बंदोबस्‍त लावला जातो, बंदोबस्‍तावर सकाळची हजेरी वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक न घेता ठाणे अंमलदार घेतो, ठाणे अंमलदार अधिकार्‍यांप्रमाणे वागतात, आजारपणात सवलत दिली जात नाही, त्‍या काळात घरी कर्मचारी पाठवून पडताळणी केली जाते, अर्जित रजा असतांनाही रजा दिली जात नाही, अशा स्‍वरूपाचे आरोप तक्रार अर्जामध्‍ये करण्‍यात आले आहेत.

संपादकीय भूमिका 

पोलीस खात्‍यात असे वरिष्‍ठ अधिकारी असतील, तर कधीतरी कायद्याचे राज्‍य येईल का ? आपल्‍याच विभागात योग्‍य पद्धतीने न वागणार्‍या अधिकार्‍यांवर कुणाचा वचक कसा नाही ?