पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या ग्रंथालयास वर्ष १७८६ मधील दुर्मिळ हस्तलिखित ‘गुरुचरित्र’ प्राप्त !

ज्या भाविकांकडे असे दुर्मिळ ग्रंथ असतील, त्यांनी ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला द्यावेत, असे आवाहन सचिव श्री. शिवराज नाईकवाडे यांनी केले आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून केलेल्या योग्य नियोजनामुळे दीपावली काळात भाविकांना दर्शन घेणे सुलभ !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून योग्य नियोजन आणि काळजी घेतल्याने भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय झाली नाही, तसेच चोरी-गैरवर्तन अशा गोष्टींना आळा बसला. याविषयी भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने ‘शारदीय महोत्सव २०२२’ची जय्यत सिद्धता !

मंदिराची स्वच्छता पूर्ण झाली असून शिखरांच्या रंगरंगोटींचे काम अंतिम टप्प्यात आहे. परिसरातील दुरुस्तीचे कामही अंतिम टप्प्यात आहे. अपंगांना श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी विशेष आसंद्यांची सोय करण्यात आली आहे.

नवरात्रोत्सवात भाविकांना २०० रुपये देऊन श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन चालू करण्याचा देवस्थान समितीचा विचार !

पैसे देऊन देवतेचे दर्शन चालू करणे हे इतरांवर अन्यायकारक नव्हे का ? ‘देवीला भावभक्तीयुक्त अंत:करणाने दर्शन घेणे आवडेल कि पैसे देऊन दर्शनाला भाविक आलेले आवडेल ?’, याचा देवस्थान समितीने विचार करावा !

श्री महालक्ष्मी मंदिराच्या दानपेटीत ८३ लाख रुपयांचे दान !

श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी दिलेल्या दानपेटीतील दानाची मोजणी करण्यात आली. १४ जून या दिवशी ३६ लाख ३१ सहस्र २०० रुपये, तर १५ जून या दिवशी उर्वरित पेट्यांमधून ४७ लाख ४३ सहस्र ४६४ रुपयांचे दान मिळाले. दोन दिवसांची एकूण रक्कम ८३ लाख ७४ सहस्र ६६४ रुपये झाली.

काही बेशिस्त भाविकांनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात टाकल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या !

मंदिराच्या  परिसरात सात्त्विकता टिकवणे हे भाविकांचेही कर्तव्य आहे, हे समजण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे यातून अधोरेखित
होते ! मंडपाच्या छतावर बाटल्या नेऊन कुणी टाकल्या याचा शोध घेऊन त्यांना शासन करायला हवे !

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या अपहार प्रकरणातील दोषींना शिक्षा कधी होणार ?

हिंदूंना सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता यांचे डोस पाजणारे सरकार केवळ हिंदूंचे मठ, मंदिरे अन् देवस्थाने कह्यात घेते. महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतात एकही चर्च, मशीद किंवा मदरसा गेल्या ७४ वर्षांत कह्यात घेण्यात आला नाही किंवा त्यांच्यावर सरकारचे नियंत्रण नाही.

श्री अंबाबाई विकास आराखड्याच्या संदर्भात पाठपुरावा करू ! – डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

या वेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दळववळणबंदी काळात मंदिरात केलेल्या उपाययोजना आणि चालू असलेली विकासकामे या संदर्भात माहिती दिली.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि भारतीय टपाल विभाग यांचे अधिकृत ‘प्रसाद पोस्टकार्ड’ पाकीट उपलब्ध !

भाविकांना कृपाप्रसाद पाठवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि भारतीय टपाल विभाग यांचे अधिकृत ‘प्रसाद पोस्टकार्ड’ पाकीट सिद्ध करण्यात आले असून भारतात, तसेच जगभरात कुठेही भाविकाला प्रसाद पोच करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

श्री जोतिबा देवाच्या मंदिराची चारही द्वारे खुली करण्यासाठी, तसेच ‘ई-पास’ बंद होण्यासाठी जोतिबा डोंगरावर बेमुदत आंदोलनास प्रारंभ !

श्री जोतिबा मंदिरातील चारही द्वारे उघडून ‘ई-पास’ सुविधा बंद करावी, या मागणीसाठी जोतिबा डोंगर येथे बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आले आहे.