कोविड केअर सेंटरमधील रुग्णांनी वापरलेले साहित्य इतरत्र फेकल्याने ग्रामस्थ त्रस्त !

तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना कळवले असता त्यांनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

कोरोनाशी लढणार्‍यांच्या पाठिशी शिवसेना नेहमीच असेल ! – संजय पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना

कोरोनाशी चार हात करणारे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ‘आशा’ स्वयंसेविका, पत्रकार यांना येणार्‍या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी बैठक झाली.

सातारा जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लस मिळण्यात अडचणी

कोरोना अटोक्यात आला असला, तरी मृत्यूदर आटोक्यात येत नसल्यामुळे पुन्हा आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

‘बकरी ईद’मुळे केरळमध्ये कोरोनाचा कहर : एका दिवसात २२ सहस्रांहून अधिक जण संक्रमित !

ईदमुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याची सामाजिक माध्यमांत चर्चा !

अमेरिकेत पुन्हा सापडत आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण !

अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या २४ घंट्यांमध्ये ६० सहस्रांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अमेरिका पुन्हा एकदा रुग्ण सापडण्याच्या प्रकरणात पहिल्या क्रमांकावर गेली आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे २४ घंट्यामध्ये २६ जणांचा मृत्यू !

कराड येथे कोरोनाबाधितांची संख्या अधिक असून पाठोपाठ सातारा आणि फलटण तालुक्यातही कोरोनाबाधित अधिक प्रमाणात आढळून येत आहेत, तर सर्वात अल्प बाधित महाबळेश्‍वर तालुक्यामध्ये आहेत.

कोरोनाची लस घेतलेले लोकही ‘डेल्टा’ विषाणू प्रकारामुळे होत आहेत संक्रमित !

कोरोनाचा ‘डेल्टा’ विषाणूचा प्रकार (व्हेरिएंट) हा घातक असून जगभरात तो चिंतेचा विषय बनला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे १३० नवीन रुग्ण

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४७ सहस्र ५२३ झाली आहे. २६ जुलैला १०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४३ सहस्र २८४ झाली आहे.

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या २ मात्रांमधील अंतर ३० दिवस करण्याची गोवा शासनाची केंद्राकडे मागणी

शाळांमध्ये काम करणार्‍या सर्वांचे लसीकरण केल्यानंतर सामाजिक अंतर पाळून कमीतकमी इयत्ता दहावी आणि बारावी यांचे वर्ग चालू करण्याचा विचार आहे.

विक्रमगड येथील कोविड केंद्रातील जेवणात अळ्या सापडल्याची रुग्णांची तक्रार !

विक्रमगड, जव्हार, वाडा आणि पालघर तालुक्यातील कोविड रुग्णांसाठी जिल्हा प्रशासनाने विक्रमगडनजीकच्या हातणे येथे रिवेरा कोविड केंद्र चालू केले आहे. रुग्णालयाकडून सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णांकडून येत आहेत.