‘बकरी ईद’मुळे केरळमध्ये कोरोनाचा कहर : एका दिवसात २२ सहस्रांहून अधिक जण संक्रमित !

ईदमुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याची सामाजिक माध्यमांत चर्चा !

  • ‘कोरोनाच्या काळात उत्सव नको’, अशी आरोळी ठोकून उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड राज्यांत होत असलेली ‘कावड यात्रा’ या हिंदूंच्या उत्सवाच्या विरोधात बोलणारे हिंदुद्वेष्टे पुरो(अधो)गामी आता ‘ब्र’ही काढणार नाहीत, हे लक्षात घ्या !
  • ‘अल्पसंख्यांकांच्या विरोधात बोलणे म्हणजे धर्मांधता’ ही धर्मनिरपेक्षतावादाची व्याख्या असल्याने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत उत्तरप्रदेशात वाढत असलेल्या कोरोना संक्रमणामुळे उत्तरप्रदेशची राजधानी ‘लखनऊ’ला ‘लाश’नऊ (‘लाश’ म्हणजे मृतदेह) म्हणून हिणवणारे धर्मनिरपेक्षतावादी आता साम्यवादी सत्तेवर असलेल्या केरळच्या दु:स्थितीवर मात्र गप्प आहेत !
  • हरिद्वार कुंभमेळ्याला ‘सुपर स्प्रेडर’ (मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरवण्याचे कारण) म्हणून हिणवणार्‍या राजकीय पक्षांनी केरळच्या स्थितीवर आता धारण केलेले मौन हिंदू कदापि विसरणार नाहीत !
प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – भारतात कोरोनाची दुसरी लाट दळणवळण बंदी आणि अन्य नियम यांमुळे नियंत्रणात आली होती. असे असले, तरी केरळमध्ये मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. नुकत्याच झालेल्या ‘बकरी ईद’च्या कालावधीत केरळच्या साम्यवादी सरकारने दळणवळण बंदीच्या अंतर्गत बरेच नियम शिथिल केल्याने २८ जुलै या एकाच दिवसात केरळ राज्यात २२ सहस्रांहून अधिक लोक कोरोनाबाधित झाले, तर १५६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे ‘ईद’ने ‘सुपर स्प्रेडर’चे (मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरवण्याचे कारण) काम केले आहे, अशी चर्चा सामाजिक माध्यमांतून होत आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशात २८ जुलै या दिवशी एकूण ४३ सहस्र ५०९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे संपूर्ण देशाच्या कोरोनाबाधितांच्या टक्केवारीत ५३ टक्के संख्या ही केवळ एका केरळ राज्याची आहे. गेल्या ५० दिवसांत एका राज्यातून २० सहस्रांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

१. उत्तर केरळ हा मुसलमानबहुल भाग असून सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या येथेच आढळून आली. मलप्पुरम् जिल्ह्यात एकाच दिवसात कोरोनाची ४ सहस्र ३७ प्रकरणे, तर कोळीकोडमध्ये २ सहस्र ३९७ प्रकरणे नोंदवण्यात आली.

२. २१ जुलै या दिवशी ‘बकरी ईद’ होती. त्या दृष्टीने केरळच्या पिनराई विजयन् सरकारने १८, १९ आणि २० जुलै या कालावधीत दळणवळण बंदीत सूट देत आवश्यक सामानाचा पुरवठा करणार्‍या दुकानांसमवेतच कपडे, ‘इलेक्ट्रॉनिक्स’ आणि दागिने या दुकानांनाही रात्री ८ पर्यंत चालू ठेवण्याची अनुमती दिली होती.

३. यावर सर्वोच्च न्यायालयाने आश्‍चर्य व्यक्त करत ‘बकरी ईदमुळे कोरोनाचे संक्रमण वाढले, तर न्यायालय आवश्यक कारवाई करील. भारतीय नागरिकांचा जगण्याचा अधिकार सर्वांत महत्त्वपूर्ण आहे. त्यास कुणी हिरावून घेता कामा नये’, असे स्पष्ट केले होते.