राज्यातील आयुर्वेद रुग्णालये शहरापासून दूर असल्यामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांची वानवा !

महाविद्यालयापासून किंवा शहरापासून आयुर्वेद रुग्णालये दूर असल्याने तिकडे रुग्ण येत नाहीत. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य जिल्ह्यांतील आयुर्वेद रुग्णालयामध्ये रुग्णांची कमतरता भासत आहे.

कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता २ लाख २ सहस्र १३१ वर

आतापर्यंत देशात ५ लाख १२ सहस्र १०९ लोक या विषाणूला बळी पडले असून २०६ नागरिक हे हल्लीच मृत्यूमुखी पडले आहेत.

ओडिशामध्ये मद्यपान आणि तंबाखू यांच्या सेवनात महिलांच्या संख्येत वाढ, तर पुरुषांच्या संख्येत घट ! – सर्वेक्षणाचा निष्कर्ष

ज्या महिलांनी घरामध्ये संस्कार करायचे, त्याच व्यसन करत असतील, तर मुलांवर संस्कार कोण करणार ?

कोरोनाचे रुग्ण घटत असल्याने अतिरिक्त निर्बंध मागे घ्या ! – केंद्र सरकारची राज्यांना सूचना  

देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या घसरत चाललेल्या संख्येचा आढावा घेऊन कोरोनाविषयीचे अतिरिक्त निर्बंध मागे घ्यावेत, अशी सूचना केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना केली आहे. आसाम आणि हरियाणा या राज्यांनी आधीच अतिरिक्त निर्बंध मागे घेतले आहेत.

पूर्व विदर्भात डेंग्यू आजारामुळे वर्ष २०१४ नंतर सर्वाधिक मृत्यू वर्ष २०२१ मध्ये !

मार्च २०२० पासून पूर्व विदर्भात कोरोनाचा प्रकोप चालू झाला. त्यामुळे कीटकजन्य आजाराशी संबंधित विभागातील कर्मचार्‍यांच्या सेवाही कोरोनाशी संबंधित कामात लावल्या गेल्या. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीकडे दुर्लक्ष झाले.

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता

या वैद्यकीय महाविद्यालयात एम्.बी.बी.एस्.च्या १०० विद्यार्थ्यांच्या एका तुकडीला शिक्षण घेता येणार आहे.

चीनमध्ये ‘हिवाळी ऑलिंपिक २०२२’च्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ

चीनमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यापासून चीनने ‘झिरो कोविड’ धोरण अवलंबले आहे. यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर चाचणी केली जाते.

नागपूर येथे रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांची आधुनिक वैद्यांना मारहाण !

उपचाराच्या वेळी रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेले रुग्णाचे नातेवाईक आणि मित्र यांनी आधुनिक वैद्य अन् रुग्णालयातील कर्मचारी यांना मारहाण केली, तसेच रुग्णालयाच्या साहित्याची तोडफोड केली.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील विलंब टाळण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयात आणखी कर्मचारी वाढवण्याची मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष का घालत नाही ?

६ मासांपासून रिक्त असलेल्या जागेवर चिकित्सकाची (फिजिशियनची) नियुक्ती !

जिल्हा शासकीय रुग्णालयात पूर्णवेळ आधुनिक वैद्य असणे आवश्यक होते. हृदयरोग असणार्‍यांचीही संख्या रुग्णालयात अधिक आहे. यावरही आता तातडीने उपचार होणार आहेत.