मुंबईतून कोरोना जाण्यास प्रारंभ !

शहरातील कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट ओसरायला लागली असून दैनंदिन रुग्णसंख्या ६ सहस्रांपर्यंत खाली आली आहे. मुंबईत कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बर्‍यापैकी ओसरलेली असेल.

डॉ. अनिरुद्ध जोशी यांच्या ‘नाडी तरंगिणी’ या उपकरणाला पारितोषिक घोषित !

डॉ. जोशी यांनी बनवलेले हे उपकरण १२ देशांत वापरले जात आहे, तसेच याच्या साहाय्याने १ लाख लोकांचे आरोग्य आणि शारीरिक पडताळणी यांची माहिती त्यांच्याकडे संकलित स्वरूपात उपलब्ध आहे.

वर्धा येथील अवैध गर्भपात प्रकरणी आधुनिक वैद्य नीरज कदम यांना अटक !

जिल्ह्यातील आर्वी येथील अवैध गर्भपात प्रकरणी पोलिसांनी कदम रुग्णालयातील आधुनिक वैद्या रेखा कदम यांचे पती आधुनिक वैद्य नीरज कदम यांना अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणातील आरोपींची संख्या ६ झाली आहे. 

देहलीत कोरोनाला बळी पडलेल्यांपैकी ७५ टक्के लोक लस न घेतलेले !

देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस गतीने वाढत आहे. मागील २४ घंट्यांत देशात २ लाख ६४ सहस्रांहून अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. देशातील कोरोना संक्रमणाचा दर आता १४.७८ टक्क्यांहून अधिक झाला आहे.

गोव्यात दिवसभरात ३ सहस्र ७२८ कोरोनाबाधित

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर आणि परिचारिका मिळून अंदाजे १०० जण कोरोनाबाधित

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट !

येथील कोरोनाची रुग्णसंख्या आता घटतांना दिसत असून परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसून येत आहे. यासंदर्भात ‘कोविड टास्क फोर्स’चे सदस्य आधुनिक वैद्य अजित देसाई यांनी माहिती दिली आहे.

कोरोनाची तिसरी लाट मार्चमध्ये संपेल ! – आयआयटी कानपूरच्या प्राध्यापकाचा दावा

जानेवारीच्या शेवटी आणि फेब्रुवारीच्या आरंभी कोरोना गाठेल सर्वोच्च स्तर ! कोरोनाच्या दुसर्‍या लाटेपेक्षा अधिक रुग्णसंख्या !

युरोपमधील ५० टक्के नागरिक ओमिक्रॉनने बाधित होतील ! – WHO

गेल्या वर्षी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये भारतामध्ये कोरोना गतीने पसरल्याने पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांनी येनकेन प्रकारेण भारताला हिणवले. आता युरोप मरणप्राय स्थितीला आला असतांना तेथील प्रसारमाध्यमे मूग गिळून गप्प आहेत. हा त्यांचा दुटप्पीपणा आहे, हे लक्षात घ्या !

महाराष्ट्र राज्य दळणवळण बंदीच्या उंबरठ्यावर ?

७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी वाढल्यास दळणवळण बंदीविना पर्याय नाही !

गोव्यात कोरोनाबाधित १ सहस्र ५९२ नवीन रुग्ण

कोरोनाच्या चाचणीच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे दिवसभरातले प्रमाण २७.८ टक्के आहे.