नवी देहली – कोरोनाचा नव्याने संसर्ग झालेल्या नागरिकांची प्रतिदिनची संख्या ही सलग १५ दिवस एक लाखाहून अल्प राहिली आहे. केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण ४ कोटी २८ लाख ३८ सहस्र ५२४ भारतियांना कोरोनाचा संसर्ग झाला असून सध्या केवळ २ लाख २ सहस्र १३१ जणांनाच कोरोना विषाणूने ग्रासले आहे. आतापर्यंत देशात ५ लाख १२ सहस्र १०९ लोक या विषाणूला बळी पडले असून २०६ नागरिक हे हल्लीच मृत्यूमुखी पडले आहेत.