(म्हणे) ‘डेंग्यू, मलेरिया, कोरोना यांच्याप्रमाणेच सनातन धर्मालाही संपवायचे आहे !’- तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी

तमिळनाडूमध्ये सनातन निर्मूलन परिषद घेतली जाते आणि त्याला राज्याचे मंत्री उपस्थित रहातात, हीच त्यांची धर्मनिरपेक्षता आहे का ?

हुब्ब्ळ्ळी (कर्नाटक) येथील ईदगाह मैदानात गणेशोत्सव साजरा करण्यास अनुमती

काँग्रेस आणि एम्.आय.एम्. यांच्याकडून विरोध

धार्मिक ग्रंथांचा अवमान करणे, हा गुन्हा असल्याचा कायदा करा !

उत्तरप्रदेशातील आमदार डॉ. राजेश्‍वर सिंह यांची केंद्रीय कायदामंत्री आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

व्याघ्रक्षेत्राबाहेरील बफर झोनचा वापर शेतीकरता करता येईल ! – राजेंद्र केरकर

सध्या म्हादईपासून खोतीगावपर्यंतचा पट्टा व्याघ्रक्षेत्र अधिसूचित करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. उरलेला जो भाग म्हणजे बफर झोन आहे, तिथे लोक शेती आणि बागायती करू शकतात, अशी आश्वासक माहिती पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी दिली आहे.

गोव्यात कॅसिनोंना दिलेल्या अधिमान्यतेमुळेच वासनांधतेचा उद्रेक ! – डॉ. नंदकुमार कामत, गोवा विद्यापिठातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक आणि संशोधक

कॅसिनो म्हणजेच जुगार याला महसूल प्राप्तीसाठी अधिमान्यता दिल्यानंतर समाजाचे नैतिक अध:पतन हे ठरलेलेच आहे. गोव्यात कॅसिनोला दिलेल्या अधिमान्यतेचे दृश्यपरिणाम आता दिसू लागले आहेत.

क्रीडा खात्याकडून शिक्षकाला पोलीस कोठडीत असतांनाच निलंबनाचा आदेश

फातर्पा येथील शाळेतील शारीरिक शिक्षक रमेश गावकर लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी कुंकळ्ळी येथील पोलीस ठाण्याच्या कोठडीत असतांनाच क्रीडा खात्याकडून त्याला १ सप्टेंबर या दिवशी त्याच्या निलंबनाचा आदेश देण्याचा निराळा प्रकार घडला आहे.

विद्यालयांतील लैंगिक शोषणाच्या विरोधातील समित्यांना प्रशिक्षण देणार ! – शिक्षण संचालक झिंगडे

वाढते विनयभंग पाहून आता प्रशिक्षण देणार्‍या शिक्षण खात्याने आतापर्यंत हे का केले नाही ? केवळ कागदोपत्री समित्या स्थापन करून खाते गप्प बसले का ?

‘आदित्य एल् १’चे यशस्वी प्रक्षेपण !

भारताचे ‘आदित्य एल् १’ हे यान पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर जाऊन सूर्याचा अभ्यास करणार आहे. चीनने त्याच्या यानावर भारतापेक्षा अधिक पैसे खर्च केले आहेत.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’द्वारे भारतातील विवाहसंस्था पद्धतशीरपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सिद्धार्थ यांनी सांगितले की, लिव्ह इन रिलेशनशिप या देशात विवाहसंस्था कालबाह्य झाल्यानंतरच सामान्य मानली जाईल.

‘जेट एअरवेज’चे संस्थापक नरेश गोयल यांना अटक !

‘जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड’ आस्थापनाचे संस्थापक नरेश गोयल (वय ७४ वर्षे) यांनी कॅनरा बँकेची ५३८ कोटी रुपयांची फसवणूक केली. याच्याशी संबंधित ‘मनी लाँड्रिंग’ (काळा पैसा पांढरा करणे) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) त्यांना अटक केली.