पणजी, १ सप्टेंबर (वार्ता.) – वर्ष १९९३ मध्ये तत्कालीन वीजमंत्री तथा विद्यमान पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांच्या विरोधातील वीजदेयक सवलत घोटाळा प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत. पोलिसांना या प्रकरणी ४ साक्षीदार सापडू शकलेले नाहीत. यामुळे आतापर्यंत सापडू न शकलेल्या साक्षीदारांची संख्या १० वर पोचली आहे. यामुळे पोलिसांनी आता या १० साक्षीदारांना ‘समन्स’ पाठवून या प्रकरणाची सुनावणी चालू असलेल्या मडगाव न्यायालयात उपस्थित रहाण्यास सांगितले आहे. साक्षीदारांच्या अभावी मंत्री मावीन गुदिन्हो यांच्या विरोधातील वीजदेयक सवलत प्रकरणाचे अन्वेषण ठप्प होण्याची चिन्हे आहेत.
संपादकीय भूमिका
|