(म्हणे) ‘रावण आसुरी वृत्तीचा नव्हता, तोही माणूस होता !’

रावण खलनायक आणि राक्षस होता, हे जगजाहीर असतांना अशा प्रकारचे त्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न चित्रपटातून होत असेल, तर आताच हिंदूंनी या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवून तो रहित करण्यास निर्मात्यांना भाग पाडले पाहिजे !

देहलीमध्ये लाचखोरीच्या प्रकरणात भाजपच्या नगरसेवकाला अटक

कारवाई झाली, तरच अन्य लोकप्रतिनिधी भ्रष्टाचार करण्यास धजावणार नाहीत !

‘कोवॅक्सिन’ लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर १५ दिवसांनी हरियाणाच्या आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची बाधा

‘कोवॅक्सिन’ या ‘भारत बायोटेक’ बनवत असलेल्या लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीसाठी हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना १५ दिवसांपूर्वी ही लस टोचण्यात आली होती; मात्र आता विज यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणार्‍या सार्वजनिक बँका तपशील लपवून ठेवत आहेत ! – विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

सर्वसामान्य कर्जदारांचे हप्ते थकल्यावर त्यांच्यामागे वसुलीसाठी तगादा लावणार्‍या अधिकोषांनी कर्ज न फेडणार्‍या थकबाकीदारांची माहिती गोपनीय ठेवणे अन्यायकारकच आहे.

भाग्यनगर महापालिका त्रिशंकू स्थितीत !

भाग्यनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. सर्वाधिक ५५ जागा तेलंगाणा राष्ट्र समितीला मिळाल्या आहेत, तर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या भाजपला ४८ जागा आणि तिसरा क्रमांक मिळालेल्या एम्.आय.एम्. ला ४४ जागा मिळाल्या आहेत.

‘मराठा विकास प्राधिकरणा’च्या विरोधात कर्नाटकमध्ये कन्नड संघटनांचा राज्यव्यापी बंद

बंद म्हणजे जनतेला वेठीस धरणे होय ! यामुळे देशाचीही वित्तहानी होते. यामुळे अशी आंदोलने करणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे दोघा धर्मांधांवर ‘लव्ह जिहाद’विरोधी गुन्हा नोंद

‘लव्ह जिहाद’ची कित्येक प्रकरणे सर्रास घडत असूनही ‘लव्ह जिहाद’ कुठे आहे ?’ हा प्रश्‍न विचारणारे डोळे असूनही आंधळेच होत ! त्यामुळेच उत्तरप्रदेश शासनाप्रमाणेच केंद्र सरकारनेही ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा !

मऊ (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

येथे एका हिंदु युवतीला ‘राहुल’ नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी शबाब नावाच्या तरुणावर आणि त्याच्या कुटुंबातील १४ जणांवर ‘लव्ह जिहाद’विरोधी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

देहली दंगल भडकावणार्‍या इस्लामी संघटनेकडून आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना साहाय्य

शेतकर्‍यांच्या आंदोलनात खलिस्तान्यांचाही समावेश आहे, हे उघड होत असतांना आणि जिहादी विचारसरणीचेही लोक यात सहभागी होतांना दिसत असल्याने हे आंदोलन आता देशविरोधी होऊ लागले आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

शेतकरी आंदोलनाच्या नावाने त्यात घुसलेल्या धर्मांध संघटना !

नवी देहलीच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना साहाय्य करणार्‍या संघटनांमध्ये देहली दंगलीच्या प्रकरणी नाव आलेल्या ‘युनायटेड अगेन्स्ट हेट’ (यू.ए.एच्.) या इस्लामी संघटनेचाही समावेश आहे. तिला २५ मशिदींमधून साहाय्य मिळत आहे.