मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे दोघा धर्मांधांवर ‘लव्ह जिहाद’विरोधी गुन्हा नोंद

विवाहित हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न

  • ‘लव्ह जिहाद’ची कित्येक प्रकरणे सर्रास घडत असूनही ‘लव्ह जिहाद’ कुठे आहे ?’ हा प्रश्‍न विचारणारे डोळे असूनही आंधळेच होत ! त्यामुळेच उत्तरप्रदेश शासनाप्रमाणेच केंद्र सरकारनेही ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा !
  • हिंदु महिलांना आणि तरुणींना धर्मशिक्षण नसल्याने ते धर्मांधांच्या प्रेमाच्या जाळ्यात अलगद अडकतात अन् त्यांच्या आयुष्याची हानी होते ! हे रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हिंदूंना धर्मशिक्षण द्यावे !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील मंसूरपूर पोलीस ठाण्यात उत्तराखंड राज्यातील सलमान आणि नदीम यांच्या विरोधात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोघांनी एका विवाहित हिंदु महिलेचे बलपूर्वक धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. लव्ह जिहादविरोधी कायदा झाल्यानंतरचा हा या जिल्ह्यात नोंदवण्यात आलेला पहिलाच गुन्हा आहे.

या महिलेचा पती अक्षय त्यागी एका कारखान्यात कंत्राटदार आहे. नदीम आणि सलमान या कारखान्यात काम करतात. या दोघांचे अक्षय त्यागी यांच्या घरात येणेजाणे होते. नदीम याने त्यागी यांच्या पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि विवाह करण्याचे आमीष दाखवले. तसेच तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव घालण्यात आला. याची माहिती मिळाल्यावर त्यागी यांनी पोलिसांत तक्रार केल्यावर या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.