तृप्ती देसाई यांना ‘जशास तसे’ उत्तर देऊ ! – शिर्डी ग्रामस्थ

भारतीय परंपरा आचरणात आणण्यासाठी संघटितपणे कृतीशील भूमिका घेणारे शिर्डी येथील ग्रामस्थ आणि सामाजिक संघटना यांचे अभिनंदन !

८ डिसेंबरला शेतकर्‍यांचा एक दिवसीय भारत बंद

गेल्या काही दिवसांपासून कृषी कायद्यावरून पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेश येथील शेतकर्‍यांच्या ‘चलो दिल्ली’ या आंदोलनातील शेतकरी संघटनांशी ५ डिसेंबरला केंद्र सरकार तिसर्‍या फेरीची चर्चा करणार आहे.

दोषी लोकप्रतिनिधींवर आजीवन बंदी घालण्याचा नियम नाही !

गुन्हेगार लोकप्रतिनिधींवर आजन्म बंदीचा नियम नसेल, तर तो सरकारने आता करणे आवश्यक आहे. तरच भारतीय लोकशाही अधिक स्वच्छ होईल आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण अल्प होण्यास साहाय्य होईल ! यासाठी सरकारने इच्छाशक्ती दाखवण्याची आवश्यकता आहे, असेच जनतेला वाटते !

६० व्या गोवा मुक्तीदिन कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित रहाणार

१९ डिसेंबर २०२० या दिवशी होणार्‍या ६० व्या गोवा मुक्तीदिन कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील २६ कार्यालयांवर ईडीच्या धाडी

केंद्र सरकारने लवकरात लवकर या जिहादी संघटनेवर बंदी घातली पाहिजे, अशीच हिंदूंची मागणी आहे !

माता अमृतानंदमयी यांच्या चेन्नई येथील आश्रमाचे स्वामी विनयमर्थ चैतन्य यांनी दिले सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद !

सनातन संस्थेचे साधक श्री. जयकुमार आणि सौ. सुगंधी जयकुमार यांनी येथील माता अमृतानंदमयी आश्रमात स्वामी विनयमर्थ चैतन्य यांची १ डिसेंबर या दिवशी साधकांनी भेट घेतली. या वेळी स्वामीजींना सनातन संस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली.

पुनर्अन्वेषणाचा आदेश वैयक्तिक द्वेषापोटी, प्रकरण सी.बी.आय्.कडे हस्तांतरित करावे !

वास्तूसजावटकार अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी मला अनधिकृत आणि सूडबुद्धीने अटक करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधिकार नसतांनाही केवळ माझी छळवणूक करण्याच्या उद्देशाने या प्रकरणाच्या पुनर्अन्वेषणाचा आदेश दिला आहे.

धर्मांतराचे षड्यंत्र करणार्‍यांना तोडून टाकू ! – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

भाजपच्या मुख्यमंत्र्यांकडून हिंदूंना हेच अपेक्षित आहे !

कोरोनाच्या बनावट लसीची विक्री करण्यासाठी गुन्हेगारी जगत सक्रीय होण्याची शक्यता ! – इंटरपोलची चेतावणी

लवकरच जगातील विविध देशांमध्ये कोरोनावर लस येण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यापासून लसीकरणला प्रारंभही होणार आहे.

उत्तरप्रदेशमध्ये दांदूपूर रेल्वे स्थानकाचे नाव आता ‘माँ बाराही देवी धाम’ होणार

राज्यातील लक्ष्मणपुरी ते वाराणसी या मार्गावरील प्रतापगड-बादशाहपूरच्या मधे असणार्‍या दांदूपूर रेल्वे स्थानकाचे नाव पालटून आता ‘माँ बाराही देवी धाम’ असे करण्यात येणार आहे.