देशातील ऑक्सिजनचे लेखापरीक्षण आणि त्याच्या पुरवठ्याच्या पद्धतीवर पुन्हा विचार करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला आदेश

देशभरातील ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ऑक्सिजनचे लेखापरीक्षण करण्याची आणि त्याच्या पुरवठ्याच्या पद्धतीवर पुन्हा विचार करण्याचीही आवश्यकता आहे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला.

बंगालमध्ये केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन् यांच्या वाहनावर आक्रमण

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन् यांच्यावर केजीटी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पंचखुडी येथे आक्रमण करण्यात आले. त्यांच्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.

एकही खाट रिकामी नसतांना आता ३ सहस्र २१० खाटा एका दिवसात रिकामी !

भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी शहरातील रुग्णालयांमधील खाटा मिळण्यासाठी लाच घेण्यात येत असल्याचा आरोप केल्यानंतर आता रुग्णालयांत ३ सहस्र २१० खाटा रिकामी असल्याचे या संदर्भातील संकेतस्थळावर दाखवण्यात येत आहे.

बनावट धनादेश वटवणार्‍या टोळीचा सूत्रधार देहली येथून कह्यात !

कायद्याचे भय नसलेले गुन्हेगार ! गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नसल्यामुळे ते सराईत होतात !

लसीचे उत्पादन एका रात्रीत वाढत नाही ! – अदार पुनावाला

उर्वरित ११ कोटी लसी लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील, असे स्पष्टीकरण सिरम सीरम इन्स्टिट्यूटकडून दिले आहे.

न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणार्‍या अधिकार्‍यांना कारागृहात टाकल्याने नाही, तर काम केल्याने ऑक्सिजन मिळेल !

अधिकार्‍यांना कारागृहात टाकल्याने रुग्णांना ऑक्सिजन मिळणार नाही, तर प्रत्यक्ष काम करण्याची आवश्यकता आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला देहलीला ऑक्सिजनच्या  तुटवड्यावरून फटकारले.

बेंगळुरू येथील रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी लाच घेऊन दिल्या जात आहेत खाटा ! – भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांचा आरोप

सूर्या यांनी आरोप करतांना म्हटले की, बेंगळुरू महानगरपालिकेचे अधिकारी, बाहेरील दलाल, कोविड वॉर रूम आणि कॉल सेंटरमधील प्रमुख हा घोटाळा करत आहेत. या रुग्णालयामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसणार्‍या व्यक्तीच्या नावाने खाट आरक्षित करून ठेवली जाते

मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय केंद्रशासनाने तात्काळ घ्यावा, संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाचा विषय हा कोणत्या एका पक्षाचा नाही. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्ष एकत्र येऊन आपणाला हवे ते साहाय्य करू. मराठा समाज सहनशील आहे. ही संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे.

भारतात तिसरी लाट येणे अटळ ! – केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन्

भारतात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार पहाता ते होणार आहे. केवळ ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणे कठीण आहे. आपण या तिसर्‍या लाटेसाठी सिद्ध रहायला हवे…..

ममता बॅनर्जी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ !

ममता बॅनर्जी यांनी ५ मे या दिवशी सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या तिसर्‍यांदा मुख्यमंत्री बनवल्या आहेत. या वेळी केवळ त्यांचाच शपथविधी पार पाडला. अन्य मंत्र्यांचा शपथविधी ६ किंवा ७ मे या दिवशी होण्याची शक्यता आहे.