पुणे – देशात १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणास प्रारंभ झाल्याने लसींची मागणी वाढली आहे; परंतु लस निर्मिती प्रक्रिया ही कौशल्याधारित प्रक्रिया आहे. मागणी वाढली म्हणून एका रात्रीत उत्पादन वाढवता येत नाही, असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पुनावाला यांनी म्हटले आहे. भारतात दुसर्या लाटेची तीव्रता पहाता लसींचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न आम्ही करीत आहोत. पुढील काही मासांत ११ कोटी लस सरकारला देण्यात येईल.
Not possible to ramp up vaccine production overnight: SII CEO Adar Poonawala https://t.co/9CTC2oaYQJ
— The Times Of India (@timesofindia) May 3, 2021
सरकारशी एप्रिलपासून सामंजस्याने काम करीत असून आम्हाला वैज्ञानिक, नियामक आणि आर्थिक अशा सर्व प्रकारचा पाठिंबा मिळाला आहे. तसेच १०० प्रतिशत अग्रिम रकमेपोटी भारत सरकारकडून १७३२.५ कोटी रुपये मिळाले आहेत. एकूण २६ कोटी लसींच्या मागणीपैकी १५ कोटी लसींचे वितरण केले असून उर्वरित ११ कोटी लसी लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील, असे स्पष्टीकरण सिरम सीरम इन्स्टिट्यूटकडून दिले आहे.