अण्वस्त्रे बनवण्यासाठी वापरण्यात येणारे ७ किलो युरेनियम बाळगणार्‍या दोघांना अटक !

युरेनियम खरेदी करण्यासाठी कुणी इच्छुक आहे का, याचा ते दोघे शोध घेत असतांनाच पथकाने धाड टाकली.

केंद्राकडून महाराष्ट्रात येणारा ऑक्सिजनचा पुरवठा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रोखला

केंद्र सरकारने या प्रकरणात लक्ष घालून महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत !

कोरोनाचा संसर्ग झाल्याने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू रुग्णालयात भरती

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना म. गांधी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याच्या माहितीनंतर येथे मोठ्या संख्येने त्यांचे भक्त गोळा झाले.

काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार, तर एकाचे आत्मसमर्पण

कानिगाम भागात हे आतंकवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावर या परिसराला घेराव घालत शोधमोहीम राबवण्यात आली.

कोरोनासारख्या महामारीतही स्थिर रहाण्यासाठी आणि आत्मबळ वाढवण्यासाठी साधना करणे हा महत्त्वपूर्ण उपाय ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या ऑनलाईन विशेष चर्चासत्रांतर्गत ‘कोरोना महामारीत मनाला स्थिर कसे करावे ?’ या विषयावर उद्बोधक चर्चासत्र

प्रसिद्ध कुस्तीपटू सुशील कुमार याच्यावर हत्येचा आरोप

ऑलंपिकमध्ये पदक मिळवणारा भारताचा कुस्तीपटू सुशील कुमार हा हत्येच्या प्रकरणी पसार झाल्याने देहली पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सुशील कुमार याच्या घरावर धाडही टाकली होती.

सिरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याची मागणी 

कोविशिल्ड लसीची निर्मिती करणार्‍या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

कोरोनाबाधित तरुणीशी अश्‍लील वर्तन करणार्‍या २ वॉड बॉयची नोकरीवरून हकालपट्टी

कोरोना संकटाच्या काळात अशा प्रकारची कृती करणार्‍यांना आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा केली पाहिजे !

‘गायत्री मंत्राने कोरोना बरा होऊ शकतो का ?’ यावर होणार संशोधन !

केवळ गायत्री मंत्रच नव्हे, तर अन्य मंत्रांचा अन्य कोणत्या आजारांच्या निर्मूलनासाठी उपयोग होतो, याचेही आता संशोधन केले पाहिजे !

मद्रास उच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्यातील वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

देशातील नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात आल्याने मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला उत्तरदायी ठरवून ‘खुनाचा गुन्हा नोंदवायला हवा’, अशा शब्दांत फटकारले होते.