राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक मिळण्यासाठी न्यायालयात याचिका

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक द्यावे, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. या याचिकेत सध्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या संजय पांडे यांना पदावरून हटवण्याचीही मागणीही करण्यात आली आहे. अधिवक्ता दत्ता माने यांनी ही याचिका केली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ३ वरिष्ठ अधिकार्‍यांची नावे पोलीस महासंचालक पदासाठी शिफारस करण्यात आली आहे; मात्र अद्यापही कायमस्वरूपी पोलीस महासंचालक नेमण्यात आले नसून संजय पांडे महासंचालक पदावर कायम आहेत.  राज्य सरकार त्यांना जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अतिरिक्त पदाचा कार्यभार असलेल्या पांडे यांना तात्काळ पदावरून हटवून केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आलेल्या अधिकार्‍यांपैकी एका अधिकार्‍यांची पूर्णवेळ महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेतून केली आहे.