मुंबई – येथे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. शहरात ४ पटींनी कोरोनाच्या रुग्णसंख्येत वृद्धी झाली असून ३०० हून अधिक इमारती प्रतिबंधित क्षेत्र (सील) म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. दादर आणि दादर पार्क येथील भाग प्रतिबंधित क्षेत्र (कंटन्मेंट झोन) करण्यात आले आहेत. माहीम आणि धारावी येथेही पुष्कळ प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईतही कोरोनाबाधितांची संख्या २५ सहस्रांच्या पुढे गेली आहे. राज्यात मुंबई, पुणे हे जिल्हे कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित आहेत. यामध्ये ३६४ आधुनिक वैद्य पॉझिटिव्ह आले आहेत. या रुग्णांसाठी शहरातील रुग्णालयांमध्ये ३५ सहस्रांहून अधिक खाटा सिद्ध करण्यात आल्या असून त्यांपैकी ६ सहस्र ५३२ खाटा वापरात आहेत.