नवी मुंबई – सिडकोच्या हेटवणे धरणातून होणारा पाणीपुरवठा तांत्रिक कामामुळे २५ आणि २६ फेब्रुवारी या दिवशी बंद असणार आहे, अशी माहिती सिडकोने प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. द्रोणागिरी, उलवे आणि खारघर या क्षेत्रांत हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. हेटवणे पाणीपुरवठा योजनेसाठी जिते येथील उपकेंद्रावरून वीज पुरवली जाते. या उपकेंद्राची दुरुस्ती करण्यासाठी वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सिडकोचे हेटवणे जल शुद्धीकरण केंद्र बंद असणार आहे. हेटवणे जलवाहिनीद्वारे ज्या नोड आणि गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो, तो २५ फेब्रुवारी या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून २६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत बंद रहाणार आहे.