कारागृहातील बंदीवानांना ५० सहस्रांपर्यंत कर्ज मिळणार !

कारागृहातील कामांसाठी मिळणाऱ्या बंदीवेतनाच्या आधारावर महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक बंदीवानांना कर्जपुरवठा करणार आहे. त्यानुसार बंदीवानांना ७ टक्के इतक्या माफक दराने कर्ज दिले जाईल.

एप्रिल २०२२ मध्ये महाराष्ट्रात सलग ३ दिवस बँका बंद !

एप्रिल २०२२ पासून नवीन आर्थिक वर्ष चालू होणार आहे. त्यातच महाराष्ट्रात सलग ३ दिवस बँका बंद रहातील. त्यामुळे ज्यांना बँकांच्या संदर्भात काही कामे करायची असल्यास ती ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावीत.

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ५ धर्मांधांना मुंबईत अटक !

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ५ धर्मांधांना दिंडोशी पोलिसांनी घाटकोपर येथे अटक केली. हुसैन कुरैशी, अब्दुल रज्जाक, रफीक शेख, सलीम आजम शेख आणि अली निजामुद्दीन खान अशी त्यांची नावे आहेत.

आरोपपत्र प्रविष्ट करण्यास अमली पदार्थ विरोधी पथकाला आणखी वेळ हवा !

कार्डिलिया जहाजावरील अमली पदार्थ सापडल्याच्या प्रकरणात अमली पदार्थविरोधी विभागाच्या विशेष अन्वेषण पथकाने आरोपपत्र प्रविष्ट करण्यास आणखी ९० दिवसांचा कालावधी मिळावा, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे.

हिंदु सणांचा विषय आला की, सरकारच्या हाताला लकवा मारतो का ? – आशिष शेलार, नेते, भाजप

हिंदु सणांना अनुमती देण्याचा विषय आला की,  सरकारच्या हाताला लकवा मारतो का ?, असा प्रश्न भाजपचे नेते आणि आमदार अधिवक्ता आशिष शेलार यांनी २९ मार्च या दिवशी पत्रकारांशी बोलतांना उपस्थित केला आहे.

अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाकडून उन्हाळी सुट्या रहित !

कोरोनाच्या संसर्गामुळे दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी झाली. आता शाळा चालू झाल्या असून अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मागणी करत आहेत.

आमदारांसाठी वेगळा गृहनिर्माण प्रकल्प राबवला जाऊ नये ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबईमध्ये आमदारांसाठी ३०० घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळात केली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर काही प्रसारमाध्यमांनी आमदारांना विनामूल्य घरे देण्यात येणार आहेत, अशी वृत्ते प्रसिद्ध केली होती.

नारायण राणे यांना अनधिकृत बांधकामासाठी पाठवलेली नोटीस मुंबई महानगरपालिकेने मागे घेतली !

नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधीश’ बंगल्याच्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेडून पाठवलेली नोटीस मागे घेतली आहे. प्रशासनाने नोटीस मागे घ्यावी, यासाठी राणे यांनी पोलिसांकडे अर्ज केला होता.

‘विनाअनुदानित शाळा कृती समिती’चा इयत्ता १० वी आणि १२ वी च्या बोर्ड परीक्षेच्या पेपर पडताळणीवर बहिष्कार !

मागण्या मान्य होईपर्यंत पेपर पडताळणीसाठी शिक्षकांनी नकार दिला आहे. राज्यातील साडेसहा सहस्र शाळांमध्ये बोर्डाच्या पेपरचे गठ्ठे पडताळणीविना पडून आहेत.

मुंबईतील अनेक ठिकाणे होत आहेत मुसलमानबहुल : अनेक उद्योग-धंद्यांमध्येही मुसलमानांचा वाढता प्रभाव !

याविषयी निधर्मीवादी, सर्वधर्मसमभाववाले, काँग्रेसी, साम्यवादी, पुरो(अधो)गामी, सिने कलाकार आदी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !