पंजाब राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील आमदारांना केवळ एकाच कार्यकाळाचे सेवा निवृत्तीवेतन द्यावे ! – दत्ताजीराव देसाई, प्रदेश सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस

अशी दुहेरी पदे भूषवणारे आमदार किंवा खासदार यांना दुहेरी सेवा निवृत्तीवेतन देण्याची आवश्यकता काय ?

नवाब मलिक यांची पाठराखण केल्यामुळे भाषण अर्ध्यावर सोडून देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांचा सभात्याग !

विधानसभेच्या सभागृहात मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर न दिल्याने भाजपच्या आमदारांनी २५ मार्च या दिवशी सभात्याग केला.

शाळांमधून भगवद्गीता शिकवण्यास शासनाने अनुमती द्यावी ! – राम कदम, आमदार, भाजप

देशातील छोट्यातील छोटी न्यायपालिका आणि सर्वाेच्च न्यायपालिका यांचे कामकाज जर भगवद्गीतेची साक्ष घेऊन चालू होत असेल, तर भगवद्गीतेच्या शिक्षणाला सरकार विरोध का करत आहे ?

आशासेविकांच्या मानधनात ५०० रुपयांची वाढ करणार !  – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोरोनाकाळात आशासेविकांनी केलेले काम लक्षात घेऊन त्यांच्या मानधनात वाढ करण्यात येत आहे. यांसह राज्यस्तरावर चांगले काम करणार्‍या आशाप्रवर्तकाला १ लाख, तर आशासेविकेला ७५ सहस्र रुपये पारितोषिक देण्यात येईल.

वाहतूक पोलीस जनतेकडून करत असलेल्या पैसे वसुलीची गृहविभागाने गांभीर्याने नोंद घ्यावी !

चौकात पैसे वसूल करणारा वाहतूक पोलीस छोटा असतो; पण त्याच्या डोक्यावरचे (वरिष्ठ) पोलीस निरीक्षक किंवा सर्कल अधिकारी यांच्याकडे आपण पहात नाही. पोलिसांचे स्थानांतर करण्यासाठी दिलेले पैसे वसूल करण्यासाठी हे सर्व प्रकार केले जातात.

भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांविषयी सरकारकडून समाधानकारक उत्तरे नाहीत ! – देवेंद्र फडणवीस

मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती यशवंत जाधव यांच्या विरोधात ‘ईडी’ने कारवाई केल्यानंतर याविषयी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी विधानसभेत चकार शब्दही काढला नाही.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाजाची ४१० मिनिटे वाया; २ कोटी ८८ लाख रुपयांची हानी !

सत्ताधारी आणि विरोधक यांनी वाया गेलेला वेळ आणि आर्थिक हानी यांचा गांभीर्याने विचार करायला हवा !

३१ मार्चपर्यंत संप मागे घेतल्यास कारवाई करण्यात येणार नाही !

कर्मचार्‍यांनी संप मागे घ्यावा, यासाठी मी ७ वेळा आवाहन केले आहे. एस्.टी.च्या संपामुळे ४८ कर्मचार्‍यांनी आत्महत्या केली आहे. १९ अपघात झाले आहेत. ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्या कर्मचार्‍यांच्या वारसांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यात येईल.

मुख्यमंत्र्यांसह आदित्य, तेजस आणि रश्मी ठाकरे यांच्यावर किरीट सोमय्या यांचा आर्थिक घोटाळ्याचा आरोप !

उद्धव ठाकरे परिवाराने ‘कोमो स्टॉक्स अँड प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड’ हे आस्थापन नंदकिशोर चतुर्वेदी आणि ‘ल्यूक बेनेडिक्ट’ यांना विकले. यामध्ये ७ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

विधान परिषदेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचा ठराव एकमताने संमत !

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बेळगाव हा कर्नाटकचा भाग असल्याचे वक्तव्य केल्याचे प्रकरण