कार्डिलिया जहाजावरील अमली पदार्थांचे प्रकरण
मुंबई – कार्डिलिया जहाजावरील अमली पदार्थ सापडल्याच्या प्रकरणात अमली पदार्थविरोधी विभागाच्या विशेष अन्वेषण पथकाने आरोपपत्र प्रविष्ट करण्यास आणखी ९० दिवसांचा कालावधी मिळावा, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. २ एप्रिलपर्यंत या प्रकरणी आरोपपत्र प्रविष्ट करायचे होते. या प्रकरणी अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्यासह १८ हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.