सुट्या दुधाच्या किंमतीत वाढ !

अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबईत १ सप्टेंबरपासून सुट्या (खुले) दुधाच्या किमतीत ५ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुंबई दूध उत्पादक महासंघाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता १ लिटर दुधासाठी ८० रुपये द्यावे लागणार आहेत.

विरार येथील श्रीराम मंदिरातील दानपेटी फोडून चोरी

मंदिरांत वारंवार होणार्‍या चोरीच्या घटना रोखण्यासाठी हिंदूंनी आतातरी संघटित झाले पाहिजे !

‘पुष्पा’ चित्रपटातील अभिनेत्याच्या रूपातील श्री गणेशाची मूर्ती

कुठे महंमद पैगंबर यांचा कथित अवमान झाल्यावरूनही शिरच्छेद करणारे मुसलमान, तर कुठे स्वतःच स्वतःच्या देवतांचा विविध मार्गाने अवमान करणारे हिंदू !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा नोंद

अमित शहा स्वतः गुन्हेगार आहेत. ते गृहमंत्री असतांना दुसरे काय होणार, अशा आशयाचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहीत पवार यांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केले होते.

परळ (मुंबई) येथे पेट्रोल पंपानजीक गॅसवाहिनी फूटून लागलेली आग आटोक्यात

परळ येथील मुख्य चौक परिसरातील मुंबई महानगर पालिकेची गॅस वाहिनी फुटल्याने अचानक आग लागली. पेट्रोल पंपावरील काही कर्मचार्‍यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र गॅसवाहिनी असल्याने त्यांना ते जमले नाही.

मुंबई येथे भाजप आणि अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ यांच्या वतीने भव्य ‘गणेशोत्सव स्पर्धा २०२२’चे आयोजन

भाजप आणि अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाच्या वतीने गणेशोत्सवामध्ये मूर्ती, सजावट-देखावा आणि स्वच्छ परिसर अशा स्वरूपाच्या ३ स्पर्धा आहेत.

धर्मांतरविरोधी कायदा देशभर लागू करून त्याची कठोर कार्यवाही करा ! – प्रबल प्रतापसिंह जुदेव, प्रदेशमंत्री, भाजप, छत्तीसगड

हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेला विशेष संवाद : ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर !’

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे !

मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी जनतेला शिस्त लावणे आवश्यक !

‘गणपति बाप्पा मोरया’च्या गजरात ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणात रवाना

गणपति बाप्पा मोरया’च्या गजरात आणि टाळ मृदुंग वाजवत २८ ऑगस्ट या दिवशी गणेशोत्सावासाठी कोकणाच्या दिशेने १ सहस्र ८०० चाकरमानी रवाना झाले. मुंबई भाजपाच्या वतीने खास कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी विनामूल्य ‘मोदी एक्स्प्रेस’ या रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

अधिक तिकीटदर आकारल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे सागर चोपदार यांची ‘वैभव ट्रॅव्हल्स’च्या विरोधात तक्रार !

अधिक तिकीटदर आकारल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी २८ ऑगस्ट या दिवशी ‘वैभव ट्रॅव्हल्स’च्या विरोधात पोलीस आणि मोटार वाहन विभाग यांकडे तक्रार केली आहे.