मुंबई येथे भाजप आणि अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ यांच्या वतीने भव्य ‘गणेशोत्सव स्पर्धा २०२२’चे आयोजन

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रसाद लाड

मुंबई, २९ ऑगस्ट (वार्ता.) – भाजप आणि अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ यांच्या वतीने भव्य ‘गणेशोत्सव २०२२’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रसाद लाड यांनी २९ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. भाजप आणि अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाच्या वतीने गणेशोत्सवामध्ये मूर्ती, सजावट-देखावा आणि स्वच्छ परिसर अशा स्वरूपाच्या ३ स्पर्धा आहेत. प्रत्येक स्पर्धेतील प्रथम विजेत्यांना ३ लाख रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. दुसर्‍या क्रमांकांच्या विजेत्यांना १ लाख ५० सहस्र आणि तिसर्‍या क्रमांकांच्या विजेत्यांना ७५ सहस्र रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. स्पर्धेसाठी २४ परीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.

अधिक वाचण्यासाठी छायाचित्रावर क्लिक करा !

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतांना प्रसाद लाड म्हणाले की, खासदार सुप्रिया सुळे कधी बाजारात भाजी आणायला जात नाहीत; मात्र त्या महागाई वाढीच्या विरोधात बोलतात, तसेच केंद्रीय कृषीमंत्री असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महागाई वाढीवर कधीही चर्चा केली नाही. अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) केलेल्या कारवाईविषयी ते म्हणाले की, भ्रष्टाचाराचे पुरावे असणार्‍यांवर ‘ईडी’कडून कारवाई होते. त्यामुळे ज्याच्यांकडे पुरावे आहेत, ते ‘ईडी’कडे तक्रार करू शकतात.