सुट्या दुधाच्या किंमतीत वाढ !

दूध उत्पादक महासंघाचा निर्णय

(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई – अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबईत १ सप्टेंबरपासून सुट्या (खुले) दुधाच्या किमतीत ५ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुंबई दूध उत्पादक महासंघाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता १ लिटर दुधासाठी ८० रुपये द्यावे लागणार आहेत.

जनावरांच्या चार्‍याचे दर दुप्पट झाले आहेत, तसेच तूर, हरभरा यांच्या किमती वाढल्याने सुट्या दुधाचे दर वाढवले आहेत, असे मुंबई दूध उत्पादक महासंघाचे सदस्य सी.के. सिंह यांनी सांगितले. एकीकडे दूध महागले असतांना दिवाळीपर्यंत पोहे, चिवडा फराळही महागणार आहे. गेल्या ३ मासांपासून पोहे, भाजके पोहे, दगडी पोहे, पातळ पोहे, भडंग, मुरमुरे यांच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे ही दरवाढ झाली असून ही तेजी दिवाळीपर्यंत कायम राहील, असे व्यापार्‍यांनी सांगितले.