सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करणार्‍या वस्त्रांचा पुरस्कार करा ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा

श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने जागतिक वारसास्थळांवरील आध्यात्मिक संशोधन ‘ऑनलाईन’ सादर !

महिलेस मारहाण केल्याप्रकरणी मनसेच्या ३ कार्यकर्त्यांना अटक

मुंबादेवी परिसरात गणेशोत्सवाचा मंडप उभारण्यावरून एका महिलेला मारहाण करणार्‍या ३ मनसेच्या कार्यकर्त्यांना नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मनसेचे उपविभाग प्रमुख विनोद अरगिळे यांच्यासह ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

टिकली न लावता श्री गणेशाचे स्वागत करणार्‍या अभिनेत्रीच्या विज्ञापनास आक्षेप !

गणेशोत्सवाच्या औचित्यावर ‘रिलायन्स मार्ट’च्या वतीने करण्यात आलेल्या एका विज्ञापनाला विरोध होत आहे. ‘रिलायन्स मार्ट’च्या विज्ञापनात मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने टिकली न लावता श्री गणेशाचे स्वागत केल्याचे दाखवण्यात आले आहे.

मुंबई आणि नवी मुंबईत कृत्रिम तलावापेक्षा पारंपरिक विसर्जनाला भाविकांची पसंती !

२ सप्टेंबरला पहाटे ६ वाजेपर्यंत दीड दिवसाच्या ६० सहस्र श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी ज्योती जगताप हिने माओवाद्यांकडून स्फोटके बनवण्याचे घेतले प्रशिक्षण ! – एन्.आय.ए.

आरोपी ज्योती जगताप हिने स्वतःवरील आरोप खोटे असल्याचा दावा करत जामिनासाठी येथील उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती; परंतु ‘एन्.आय.ए.’ने याचिकेला विरोध केला.

मुंबादेवी येथे मनसेच्या उपविभाग प्रमुखाकडून महिलेला मारहाण !

एका औषधाच्या दुकानासमोर काही मनसे पदाधिकारी बांबू लावत होते. त्या वेळी तेथील एका महिलेने त्यांना विरोध केला. त्या वेळी अरगिले यांनी त्या महिलेला मारहाण केली.

सोनाली फोगाट यांना २ वेळा अमली पदार्थ देण्यात आल्याची त्यांच्या स्वीय साहाय्यकाची कबुली !

पोलिसांनी या प्रकरणी कसून अन्वेषण केल्यानंतर आरोपींनी सोनाली फोगाट यांना अमली पदार्थ दिल्याचे कबूल केले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, या प्रकरणाचे अन्वेषण पोलीस योग्य दिशेने करत आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल…

उद्दाम टॅक्सी चालकांविरोधात भ्रमणभाषच्या माध्यमातून तक्रार करता येणार !

प्रवाशांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधीत संपर्क साधून किंवा व्हॉट्सअपवर संदेश पाठवून, तसेच केवळ लघुसंदेश पाठवूनही पुराव्यासह तक्रार करता येणार आहे.

मुंबई ‘मेट्रो-३’ची आरेच्या सारीपूतनगर येथे ट्रॅकवर चाचणी

मुंबई ‘मेट्रो-३’च्या कारशेडवरून सध्या मोठा वाद चालू आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने रहित केलेल्या आरे कारशेडला सध्याच्या युतीच्या सरकारने संमती दिली. त्यानंतर आरेमध्ये कारशेड होऊ नये यासाठी पर्यावरणवादी आक्रमक झाले आहेत.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अपसमजातून ‘हलाल’विषयी वक्तव्य केले ! – यशवंत किल्लेदार, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेना

‘हलाल’च्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढा उभा करणार असून मनसे ‘नो टू हलाल’ ही मोहीम हाती घेणार आहे’, अशी घोषणा २७ ऑगस्ट या दिवशी श्री. यशवंत किल्लेदार यांनी पत्रकार परिषदेत केली होती;..