लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यशासन अधिवक्ता नियुक्त करणार !

मुंबईमध्ये धर्मांधाने हिंदु पत्नीची गळा चिरून हत्या केल्याचे प्रकरण

भाजपच्या उपप्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी घेतली पीडितेच्या कुटुंबियांची भेट

मुंबई – विवाहानंतर हिंदु धर्मीय पत्नी इस्लामप्रमाणे आचरण करत नसल्यामुळे चेंबूर येथील इक्बाल महमंद शेख या मुसलमान युवकाने तिची भर रस्त्यामध्ये गळा चिरून हत्या केली. भाजपच्या उपप्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी ३० सप्टेंबर या दिवशी चेंबूर येथे जाऊन हत्या झालेल्या विवाहितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी ‘चांगल्यात चांगले सरकारी अधिवक्ता हा खटला लढवतील. त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळेल. ही राज्यशासनाची भूमिका आहे’, असे सांगून त्यांनी पीडितेच्या कुटुंबियांना आश्वस्त केले.

उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेतली असून पोलिसांना कारवाईची सूचना दिली असल्याचे सौ. चित्रा वाघ म्हणाल्या.

या वेळी नगरसेविका आशा मराठे याही उपस्थित होत्या. या प्रकरणात पोलिसांनी इक्बाल महमंद शेख याला अटक केली असून तो सध्या कारागृहात आहे. (लव्ह जिहादला आळा बसावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कायदा करावा ! – संपादक)